मुंबई - सलमानला बॉलिवूडमध्ये 29 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचा डेब्यू चित्रपट 'बीवी हो तो ऐसी' 26 ऑगस्त, 1988 ला रिलीज झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत सलमानने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. डेब्यू चित्रपटातच सलमानने विक्की भंडारीची भूमिका केली होती. या चित्रपटात त्याच्याशिवाय रेखा, फारुक शेख, बिंदू, कादर खान, असराणी, रेणू आर्य आणि ओम शिवपुरी सारखे कलाकार होते.
कुणाला लूक बदलला, तर कुणी जगातच नाही..
- चित्रपटात डॉक्टर कमला भंडारीच्या भूमिकेत असलेल्या बिंदूचा चेहरा 29 वर्षांत बराच बदलला आहे.
- चित्रपटातील इतर अनेक कलाकार आता या जगात राहिलेले नाहीत. सूरज भंडारीच्या भूमिकेत दिसलेला अॅक्टर फारुख शेख, यांचे 27 डिसेंबर 2013 ला 65 व्या वर्षी निधन झाले.
- रेखाच्या वडिलांची भूमिका करणारे ओम शिवपुरीही आता या जगात नाहीत.
पुढील स्लाइडवर पाहा, एवढा बदलला सलमानच्या डेब्यू चित्रपटातील स्टारकास्टचा लूक..