Home »Gossip» Love Affairs Of Akshay Kumar With Heroins

B'day : गाजले आहेत खिलाडी अक्षयचे अफेयर्स, मोठी आहे त्याच्या गर्लफ्रेंडची यादी

दिव्य मराठी वेब टीम | Sep 09, 2017, 10:30 AM IST

एंटरटेनमेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने आज (9 सप्टेंबर) वयाची 50 वर्षे पूर्ण केली आहेत. 9 सप्टेंबर 1967 ला अमृतसरमध्ये जन्मलेला अक्षय टि्ंवकलसोबत लग्न करण्यापूर्वी साखरपुडा करण्यासाठी प्रसिध्द होता. अक्षय कुमारसोबत अफेअर्सची यादी मोठी आहे. त्याने अॅक्शन हीरो म्हणून बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली होती, परंतु सर्व प्रकारचे सिनेमे करतो. तसेच अक्षय कुमारच्या सिनेमांप्रमाणेच अफअर्सच्या चर्चासुध्दा तेवढ्यात होत्या.
अक्षय कुमारचे मॉडेल आणि अभिनेत्री पूजा बत्रा, शिल्पा शेट्टीपासून रेखा आणि प्रियांका चोप्रापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत अफेअरचे किस्से गाजले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अक्षयकडून मिळालेल्या धोक्यानंतर एका मुलाखतीत सांगितले होते, की अक्षयने तिचा वापर केला. मात्र आता दोघांमधील नाते सामान्य आहे.
एकेकाळी अक्षय कुमारच्या प्रेमाचे किस्से खूप प्रसिध्द होते. त्याकाळच्या प्रत्येक प्रसिध्द अभिनेत्रीसोबत त्याचे नाव जुळले होते. रविना टंडन आणि शिल्पा शेट्टीसोबत त्याच्या अफेअरच्या चर्चा इतक्या लोकप्रिय झाल्या होत्या, की दोघींपैकी एकिशी अक्षय लग्न करणार असे वाटत होते. परंतु अखेर त्याने टि्ंवकल खन्नासोबत गाठ बांधली. 17 जानेवारी 2001ला अक्षय कुमार आणि टि्ंवकल खन्ना लग्नगाठीत अडकले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोण-कोणत्या अभिनेत्रींसोबत होते अक्षय कुमारचे अफेअर...

Next Article

Recommended