आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडचे 9 फेमस Love Marriages, ज्यांचा घटस्फोटावर झाला अंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुझान आणि हृतिक रोशन - Divya Marathi
सुझान आणि हृतिक रोशन
अभिनेता हृतिक रोशन गेल्या काही दिवसांपासून सिनेमांपेक्षा आपल्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिला आहे. पत्नी सुझानपासून हृतिक कायदेशीररित्या विभक्त झाला आहे. पण आता दोघांमधील दुरावा कमी झाला की काय अशी चिन्ह दिसू लागली आहेत. अलीकडेच हृतिक सुझानसोबत 'बाहुबली 2'च्या स्क्रिनिंगला पोहोचला होता. यापूर्वीही अनेकदा हे दोघे एकत्र वेळ घालवताना दिसले आहेत. ऑक्टोबर 2014 मध्ये दोघांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेऊन आपले वैवाहिक आयुष्य संपुष्टात आणले.  

2000 साली केले होते हृतिक-सुझानने लव्ह मॅरेज....
हृतिक आणि सुझानने तब्बल 13 वर्षे एकमेकांची साथ निभावली. त्यांना हृहान आणि हृदान ही दोन मुले आहेत. विशेष म्हणजे 2000 साली या दोघांनी लव्ह मॅरेज केले होते. या जोडीची गणना बी टाऊनच्या रोमँटिक कपल्समध्ये केली जायची. रंजक बाब म्हणजे हृतिक यशोशिखरावर असताना त्याने लग्न करुन आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
 
या जोड्यांनीही घेतला आहे घटस्फोट...
हृतिक आणि सुझान यांच्याप्रमाणेच बॉलिवूडमध्ये असे अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी घटस्फोट घेऊन आपल्या जोडीदारापासून विभक्त होणे पसंत केले.
 
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, आणखी अशा काही जोड्यांविषयी ज्यांनी प्रेमविवाह केला खरा, मात्र घटस्फोटावर त्यांच्या नात्याच्या अंत झाला...
 
बातम्या आणखी आहेत...