आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14व्या वर्षीच आमिरच्या प्रेमात पडली होती किरण, \'लगान\'च्या सेटवर जुळले सुत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमिर खान आणि किरण राव - Divya Marathi
आमिर खान आणि किरण राव
मुंबई. जेव्हा किरण राव 14 वर्षांची होती, तेव्हा तिने आमिर खानचा 'कयामत से कयामत तक' सिनेमा पाहिला होता. तेव्हापासून ती त्याची दीवानी होती. कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, की हा स्टार पुढे तिचा नवरा होईल. किरण आणि आमिरची जवळीक 'लगान' सिनेमाच्या सेटवर वाढली. किरण 'लगान'मध्ये आशुतोष गोवारिकरची असिस्टंट होती.
बसमध्ये बातचीत आणि झाली मैत्री...
किरणची जबाबदारी आमिरला सेटपर्यंत आणण्याची होती. यारम्यान बसमध्ये दोघांची बातचीत व्हायची. हळू-हळू या बातचीतचे रुपांतर मैत्रीत झाले. आमिरला किरण एक आनंदी आणि समजदार व्यक्ती वाटत होती. किरण तर आधीपासूनच त्याची दीवानी होती. आमिर ज्याप्रकारे सहायक दिग्दर्शक आणि टेक्निशिअन्सला भेटायचा आणि त्यांच्यात राहत होता, तेव्हा किरणला
त्याच्यात एक सामान्य व्यक्ती दिसायचा.
'लगान'च्या शूटिंगच्या दोन वर्षांनी आमिर पहिली पत्नी रीना दत्तपासून विभक्त झाला. त्यानंतरचा काळ त्याच्यासाठी खूप कठिण होता. त्यावेळी त्याला किरणची साथ मिळाली. दोघांना जाणीव झाली, की ते एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. किरण आमिरच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करू लागली. 2005मध्ये दोघांनी या मैत्रीचे रुपांतर लग्नात केले. आमिरने लग्नाविषयी दीड वर्षे कोणतेच सार्वजनिक स्पष्टीकरण दिले नाही. आमिर किरणसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होता, त्यावेळीसुध्दा या नात्याला गुपित ठेवण्यात आले.
सिनेमात घातले होते किरणचे ईअररिंग...
'लगान' सिनेमात भुवनची भूमिका साकारण्यासाठी आमिरने जे ईअररिंग घातले होते, ते किरणचे होते. नंतर आमिर पूर्वाश्रमीची पत्नी रीनासोबत हॉटेल ताजच्या एका दुकानात किरणसाठी ईअररिंग खरेदी करण्यासाठी गेला होता. तो किरण या ईअररिंगला लकी असल्याचे सांगतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आमिर आणि किरणचे खास PHOTOS...