आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्रांच्या सांगण्यावरून दोनदा टाळले होते लग्न, वाचा अनिल कपूरची Love Story

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : अनिल कपूर पत्नी सुनीतासोबत - Divya Marathi
फाइल फोटो : अनिल कपूर पत्नी सुनीतासोबत
मुंबई- अनिल कपूर आणि त्यांची पत्नी सुनीता यांची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे. क्वचितच लोकांना ठाऊक आहे, की सुनीता यांचा आवाज ऐकण्यासाठी उत्सूक राहणा-या अनिल यांनी मित्रांच्या सांगण्यावरून दोनवेळा लग्न पुढे ढकलले होते. Love Life नावाच्या सीरिजमध्ये आज आम्ही तुम्हाला अनिल यांची लव्हस्टोरी सांगत आहोत...
केव्हा झाली पहिली भेट...
जेव्हा दोघांची पहिली भेट झाली, तेव्हा अनिल कपूर एक स्ट्रगलिंग अभिनेते होते आणि सुनीता प्रसिध्द मॉडेल. अनिल सुनीता यांना पाहताच त्यांच्या प्रेमात पडले. त्यांना सुनीताशी ओळख करायची होती, परंतु त्यांच्याकडे सुनीतापर्यंत जाण्याचा कोणताच मार्ग नव्हता. अखेर, त्यांच्या मित्रांनी त्यांना सुनीताचा नंबर दिला. त्यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरु झाले. अनिल, सुनीता यांच्या आवाजाचे दीवाने झाले.
अनिल कपूर यांचा पूर्ण खर्च करत होत्या सुनीता...
एकेदिवशी धाडस करून त्यांनी डेटवर जाण्याचा प्रस्ताव सुनीतासमोर ठेवला. सुनीताने आनंदाने स्वीकारला. त्यानंतर दोघे बस आणि टॅक्सीने मुंबईच्या एका सुंदर ठिकाणी सैर करायला गेले. सुनीता नावाजलेल्या मॉडेल असूनदेखील त्यांनी बसने फिरण्यास नकार दिला नाही. त्या अनिल कपूर यांचा सर्व खर्च करत होत्या. अखेर अनिल यांनी सुनीताला प्रपोज केले आणि हे नाते लग्नापर्यंत आले.
मित्रांनी सांगितले होते, लग्न करून करिअर संपेल...
अनिल यांनासुध्दा सिनेमे भेटायला लागले होते आणि 1984मध्ये आलेल्या 'मशाल' सिनेमातून त्यांना चांगली ओळख मिळाली. दोघांच्या घरचे या लग्नाला राजी होते. परंतु मित्रांनी अनिल यांना सल्ला दिला, की लग्न केल्यानंतर करिअर संपते. दोनवेळा लग्नाची तारिख ठरूनसुध्दा लग्न पुढे ढकलण्यात आले. नंतर थंड डोक्याने विचार केला आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. 19 मे 1984ला दोघांचे नाते पती-पत्नीचे झाले.
सुनीताने लग्नानंतर सोडले मॉडेलिंग...
लग्नानंतर सुनीताने अनिलच्या करिअरलाच आपले करिअर मानले. तिने मॉडेलिंग सोडून घर सांभाळले आणि अनिलला साथ दिली. ती अनिलसाठी ड्रेस डिझाइन करण्यापासून शूटिंगसाठी परदेशात जाण्यापर्यंत सर्व कामे करत होती. अनेकदा अनिल यांचे नाव माधूरी दीक्षितसोबत जुळले, परंतु सुनीताने या गोष्टी अफवा म्हणून टाळल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अनिल आणि सुनीता यांचे सोबतचे काही PHOTOS ....