आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Love Story : सनीच्या करिअरच्या तयारीबरोबरच सुरू होती धर्मेंद्र-हेमाच्या लग्नाचीही तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडमध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्र हे एकेकाळी सर्वाधिक चर्चेतील लव्ह कपल होते. दोघांना आपल्या प्रेमाला यशस्वी करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस २ मे रोजी साजरा करण्यात आला. 

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी दोघांनी धर्म बदलून लग्न केले. परंतु त्यानंतरसुध्दा देओल कुटुंबाने हेमा यांना आपलेसे केले नाही. विशेष म्हणजे सनी देओलला फिल्म इंडस्ट्रीमध्ये लाँच करण्याची तयारी सुरू असतानाच धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाचीही तयारी सुरू होती. धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यापूर्वी पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी विजेताचे लग्न केले होते.
 
हेमा मालिनी यांना देओल कुटुंबाकडून केवळ आडनाव मिळाले. त्यांनी स्वत:चे एक विश्व बनवून आपल्या मुलींचा सांभाळ केला असेही बोलले जाते. हेमा यांच्या दोन्ही मुलींचे लग्ने झालीत मात्र देओल कुटुंबीयांनी यात हजेरी लावली नाही. एकेकाळी धर्मेंद्रच नव्हे तर जितेंद्र आणि संजीव कुमारसुध्दा हेमा यांचे दीवाने होते. जितेंद्र आणि संजीव कुमार यांनासुध्दा हेमाशी लग्न करण्याची इच्छा होती.
 
पुढील स्लाइड्सवर वाचा कसे झाले धर्मेंद्र आणि हेमा यांचे लग्न...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत अवर्ष तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत अवर्ष तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...