आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर धर्म बदलून हिंदु बनला असता इरफान खान, अशी आहे त्याची LOVE STORY

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुतापा सिकदर आणि इरफान खान - Divya Marathi
सुतापा सिकदर आणि इरफान खान
मुंबई: अभिनेता इरफान खानने अनेक अविस्मरणीय सिनेमे केले आहेत. वर्साटाइल अभिनेता इरफान खान पडद्यावर गंभीर भूमिका साकारत असला तरी तो प्रेक्षकांना दीवाना बनवतो. परंतु तो खूपच रोमँटिक अंदाज असलेला व्यक्ती आहे. इरफान आणि त्याची पत्नी सुतापाची लव्ह स्टोरी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामादरम्यान सुरु झाली होती. असे सांगितले जाते, की सुतापासोबत लग्न करण्यासाठी इरफान हिंदु धर्म स्वीकारण्यास तयार झाला होता.
कधी सुतापाच्या प्रेमात पडला कळालेच नाही...
अभिनयाचे बारकावे शिकत असताना कधी इरफान सुतापाच्या प्रेमात पडला हे त्यालाही कळाले नाही. त्याकाळात लोक लिव्ह-इन-रिलेशनशिपविषयी बोलतदेखील नव्हते. लग्न न करता एकत्र राहत असलेल्या इरफान-सुतापाच्या आयुष्यात जेव्हा तिस-या व्यक्तीची येणार असल्याचे कळातच त्यांनी एक खोलीचे घर सोडून दोन खोल्यांचे घर शोधले. घर शोधण्यासाठी गेल्यानंतर त्यांना विचारले जात होते, 'तुम्ही विवाहित आहात का?' यावर नाही उत्तर ऐकल्यानंतर घर दिले जात नव्हते. त्यानंतर दोघांनी 1996मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला.
इरफानने सुतापाला म्हटले, की जर तिच्या कुटुंबीयांची इच्छा असेल तर मी हिंदु धर्म स्वीकारण्यास तयार आहे. परंतु याची गरज पडली नाही. परंतु सुतापाच्या घरच्यांनी त्याला तसेच स्वीकारले. इरफान एका मुलाखतीत म्हणाला होता, की त्याची पत्नी त्याचे काम बारकाईने पाहते. सुतापा नसती तर माझ्याकडे ना हॉलिवूडचे सिनेमे असते ना स्वत:चे घर.
पडद्यावर दिसणारा इरफान ख-या आयुष्यात आहे वेगळा...
सुतापाने एका मुलाखतीत सांगितले होते, की पडद्यावर गंभीर आणि कामाशी कामाशी काम ठेवणारा इरफान ख-या आयुष्यात खूप विनोदी अंदाजाचा आहे. सोबतच तो त्याचे मुले अयान आणि बाबिलसाठी 'जगातील सर्वश्रेष्ठ' वडील आहे. तसेच तो आपल्या मुलांच्या विचारांना समजून घेण्यासोबतच त्यांच्या संगोपनावरसुध्दा लक्ष देतो. इरफान म्हणतो, 'जेव्हा माझ्याकडे काम नव्हते, तेव्हा सुतापाने घर चालवले. मी जे काही आहे, ते सुतापामुळेच आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इरफान-सुतापाचे काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...