आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंदीगढमध्ये मैत्री, कोलकातामध्ये प्रेम, अशी आहे किरण-अनुपम यांची Love Story

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगढमध्ये निवडणूकीच्या प्रचारादरम्यान अनुपम खेर आणि किरण खेर - Divya Marathi
चंदीगढमध्ये निवडणूकीच्या प्रचारादरम्यान अनुपम खेर आणि किरण खेर
अभिनेत्री किरण खेर यांनी पूर्वी स्वत:ला थिएटरसाठी इतके वाहून घेतले होते, की त्यांनी 'मंडी' सिनेमातील एका भूमिकेसाठी श्याम बेनेगल यांना नकार दिला होता. थिएटरदरम्यानच चंदीगढमध्ये त्यांची मैत्री अनुपम खेर यांच्याशी झाली. कोलकातामध्ये दोघे पुन्हा भेटले आणि तिथे अनुपम खेर यांनी किरणला प्रपोज केले.
किरण यांना अनुपम खेरविषयी माहित होते...
त्यावेळी अनुपम यांना किरणविषयी काहीच माहित नव्हते. परंतु किरण यांना अनुपम यांच्याविषयी सर्वकाही माहित होते. किरण यांना हेही माहित होते, की अनुपम कोणाच्या प्रती आकर्षित होते. त्यानंतर किरण मुंबईला आल्या आणि अभिनेता आणि बिझनेसमन गौतम बेरीसोबत लग्न केले. काही वर्षांनंतर किरण यांना वाटले, की त्या आयुष्यात आनंदी नाहीये. तेव्हा त्या एका मुलाची आई होत्या. अनुपमसुध्दा करिअरविषयी परेशान होते.
पुन्हा एकदा भेटले...
दोघांची पुन्हा एकदा भेट झाली आणि मैत्रीही झाली. यादरम्यान दोघे जेव्हा एका नाटकानिमित्त कोलकातामध्ये गेले, तेव्हा किरण यांनी पाहिले, की अनुपम यांनी एका सिनेमासाठी टक्कल केले होते. त्या अनुपम यांना आश्चर्याने पाहत होत्या. त्यानंतर अनुपम खोलीतून बाहेर आले आणि त्यांना किरण दिसल्या. ते किरणला बराच वेळ टक लावून पाहत होते. त्यांना काहीतरी म्हणायचे होते, परंतु म्हणू शकले नाही. काहीवेळानंतर किरण यांच्या खोलीचे दार वाजवले आणि सरळ म्हणाले, 'मला वाटते मी तुमच्यावर प्रेम करतो'. त्यानंतर दोघांचे नाते प्रेमात बदलले.
घटस्फोटानंतर केले लग्न
काही दिवसांनी किरण यांनी पतीला घटस्फोट देऊन अनुपम यांच्याशी लग्न केले. मागील तीस वर्षांपासून दोघे वैवाहिक आयुष्य जगत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अनुपम आणि कारण यांचे RARE फोटो...
बातम्या आणखी आहेत...