आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LOVE STORY: जाणून घ्या, लारा कशी पडली विवाहित महेश भूपतीच्या प्रेमात!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लारा दत्ता आणि महेश भूपती - Divya Marathi
लारा दत्ता आणि महेश भूपती
मुंबई: क्रिकेट खिलाडी आणि बॉलिवूड अभिनेत्रींच्या प्रेमाचे किस्से नेहमी ऐकिवात असतात. एकेकाळी बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस यूनिव्हर्स लारा दत्ता आणि देशासाठी पहिला स्लॅम जिंकणारा टेनिस खेळाडू महेश भूपती हेदेखील यातून गेले आहेत. दोघेही बंगळुरुचे आहेत. महेश भूपतीने पहिल्यांदा लाराला 2000मध्ये मिस यूनिव्हर्स बनल्यानंतर पाहिले होते. तेव्हाच तो लाराच्या प्रेमात पडला होता. त्यानंतर दोघांची भेट महेशच्या एंटरटेन्मेंट आणि स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीच्या बिझनेस मिटींगमध्ये झाली होती. त्यात लाराने महेशच्या कंपनीला तिच्या कामाचे मॅनेजमेंट पाहाण्यास सांगितले होते.
दोघांच्या आयुष्यात येऊन गेलीये एक व्यक्ती...
लारासोबत लग्न करण्यापूर्वी महेश विवाहित होता. त्याच्या पहिल्या पत्नीचे श्वेता जयशंकर भूपती होते. दोघांचे लग्न सात वर्षे टिकले. महेश 2010मध्ये पहिल्या पत्नीपासून वेगळा झाला. तसेच अभिनेत्री लारा दत्ताचे नाव महेश भूपतीसोबत जुळण्यापूर्वी केली दोरजी, टायगर वुड्स, डिनो मारिया या तरुणांसोबत जुळले होते. त्यानंतर दोघे एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून भेटले. या भेटीनंतर दोघे डेटींग करायला लागले.
यूएस ओपनदरम्यान रोमँटिक अंदाजात केले प्रपोज...
महेशने लाराला अमेरिकेत एका कँडल लाइट डिनरदरम्यान अंगठी घातली होती. ही अंगठी महेशने स्वत: लारासाठी डिझाइन करून आणली होती. त्यावेळी महेश यूएस ओपन सामना खेळण्यासाठी न्यूयॉर्कला गेलेला होता. मात्र, दोघांनी लग्नाची घोषणा होईपर्यंत एकमेकांचे चांगले मित्र असल्याचेच सांगत होते.
महेशच्या साध्यापणावर फिदा होती लारा...
शांत आणि हसमुख स्वभावासाठी ओळखला जाणारा महेश भूपतीची मॅच पाहण्यासाठी आलेली लारा त्याच्या साध्यापणा फिदा झाली होती. त्यानंतर ती त्याच्या सर्व मॅच पाहू लागली होती. लारा महेशच्या स्पष्टवक्ता आणि प्रामाणिकपणावर घायाळ झाली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लारा आणि महेशचे रोमँटिक क्षण...
बातम्या आणखी आहेत...