आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रितेशने हा फोटो शेअर करत म्हटले \'हॅपी अॅनिव्हर्सरी बायको\', वाचा कसे जुळले होते दोघांचे लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील क्यूट कपल म्हणून ओळखले जाणारे रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुजा-देशमुख यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. आज त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस आहे. लग्नानंतर या दोघांच्या संसारवेलीवर रिआन आणि राहील ही दोन गोंडस फुलं उमलली आहे. या खास दिवसानिमित्त रितेशने त्यांच्या लग्नातील एक खास फोटो फेसबुकवर शेअर करुन जेनेलियासाठी क्यूट मेसेज दिला आहे. रितेश म्हणतो, ''I look at you & find my self, a stronger self, a better self, a happy self, a blessed self. Happy Anniversary Baiko @geneliad #5Years ''‬
 
दहा वर्षे केली होती डेटिंग...  
- लग्नापूर्वी तब्बल दहा वर्षे हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. 
- सनई-चौघड्यांचा निनाद, शाही मराठमोळ्या पद्धतीने वराती मंडळीने बांधलेले फेटे, राजकारणातील दिग्गज मंडळी आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या उपस्थितीत लव्हबर्ड रितेश आणि जेनेलिया 3 फेब्रुवारी 2012 रोजी दुपारी 12 वाजून 48 मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर लग्नगाठीत अडकले होते. 
- दोघांची पहिली भेट हैदराबादमध्ये 'तुझे मेरी कसम' सिनेमाच्या टेस्ट शूटदरम्यान झाली होती. 
- दोघे एकमेकांचे को-स्टार होते. 
 
पहिल्या भेटीत जेनेलियाने केले होते रितेशकडे दुर्लक्ष...  
- जेनेलिया जेव्हा पहिल्यांदा रितेशला एअरपोर्टवर भेटली तेव्हा त्याला इग्नोर करत होती. कारण ती तिच्या आईसोबत होती.
- रितेशचे वडील विलेसराव देशमुख महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री होते. म्हणून तिला वाटले, की रितेशसुध्दा वडिलांप्रमाणे नेताच होईल. परंतु जेव्हा ती त्याला भेटली आणि कुटुंबीयांप्रती त्याचे प्रेम पाहून भारावली. 
- शूटिंगनंतर रितेशने अनेद दिवस जेनेलियाला मिस केले. नंतर दोघांचे फोनवर बोलने व्हायला लागले. 
- दोघे रात्री कॉफी शॉपवर भेटत आणि तासन् तास गप्पा मारत होते. हळू-हळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 
- दोघे जवळपास 10 वर्षे डेटींग करत होते.
- दोघांपैकी कुणी आधी प्रपोज केले होते, हे त्या दोघांनासुध्दा लक्षात नाहीये. 2012मध्ये रितेश आणि जेनेलिया लग्नगाठीत अडकले. 
- रितेश सांगतो, की त्याला जेनेलियाची प्रत्येक गोष्ट आठवणीत राहण्याची सवय बेकार वाटते. तिला प्रत्येक गोष्ट आठवणीत राहते. 
- रितेशचे नेहमी बिझी राहते, जेनेलियाला आवडत नाही. ती सांगतो, की रितेश स्वत:ला प्रत्येकवेळी बिझी दाखवण्याचा प्रयत्न करतो.
 
शाही होता विवाहसोहळा
- रितेश-जेनेलियाच्या शाही विवाह सोहळ्याला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, प्रफुल्ल पटेल, अजय देवगण, काजोल, अभिषेक बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, करण जोहर, आशुतोष गोवारीकर यांच्यासह अनेक राजकारणी आणि दिग्गज कलाकार उपस्थित होते. 
- रितेश आणि जेनेलिया महाराष्ट्रीय आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठीत अडकले होते.

आज रितेश आणि जेनेलियाच्या लग्नाच्या पाचव्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांच्या लग्नसोहळ्याची खास छायाचित्रे दाखवत आहोत...  पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा रितेश-जेनेलियाचा WEDDING ALBUM... 
बातम्या आणखी आहेत...