आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Love Story: बोनी कपूर यांचे श्रीदेवीवर होते एकतर्फी प्रेम, असे जुळले सुत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोनी कपूर आणि श्रीदेवी - Divya Marathi
बोनी कपूर आणि श्रीदेवी
मुंबई. बोनी कपूर आणि श्रीदेवीच्या लव्हस्टोरीमध्ये अनेक उतार-चढाव आले आहेत. सुरुवातीला हे एकतर्फी प्रेम होते. या प्रेमाची सुरुवात 'मि. इंडिया' सिनेमापासून झाली असली तरी बोनी 1970च्या दशकात श्रीदेवी तामिळ सिनेमांत काम करत होती, तेव्हाच तिच्या प्रेमात पडले होते.
श्रीदेवीला भेटण्यासाठी चेन्नईला गेले, परंतु नाही झाली भेट...
बोनी श्रीदेवीला भेटण्यासाठी चेन्नईलासुध्दा गेले होते. परंतु श्रीदेवी सिंगापूरमध्ये असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. त्याचवेळी तिचा 'सोलहवा साल' हा पहिला सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा पाहून बोनी प्रभावित झाले आणि त्यांनी ठरवले, की ते निर्माता म्हणून श्रीदेवीसोबत सिनेमा करणार. एकेदिवशी सिनेमाच्या सेटवर बोनी श्रीदेवीची भेट घेण्यासाठी पोहोचले. पण श्रीदेवी यांनी त्यांची काम त्यांची आई पाहते.
जेव्हा ते होणा-या सासूला भेटले तेव्हा त्या म्हणाल्या श्रीदेवी 'मि. इंडिया' सिनेमात काम करेल, परंतु तिचे मानधन 10 लाख रुपये असेल. बोनी यांनी उत्तर दिले, की ते 11 लाख रुपये देतील. श्रीदेवीच्या आईचा आनंद गगनात मावेना. अशाप्रकारे बोनी यांना आपल्या प्रेमाजवळ येण्याची
संधी मिळाली.
त्यांनी श्रीदेवीसाठी सर्व स्पेशल सुविधा ठेवल्या. परंतु अजूनही त्यांचे प्रेम एकतर्फीच होतेच. कारण श्रीदेवी मिथुन चक्रवर्तीवर प्रेम करत होती. दुसरीकडे बोनी कपूर यांनी मोना कपूरसोबत अरेंज मॅरेज केले होते. त्यानंतर मिथुन आणि श्रीदेवीच्या विभक्ताच्या चर्चा रंगू लागल्या. बोनी यांनी पुन्हा श्रीदेवीसोबत जवळीक वाढवण्यास सुरुवात केली. एकदा बोनी श्रीदेवीला भेटण्यासाठी स्वित्झर्लंडला पोहोचले होते.
आईच्या आजारपणामुले संपला होता दूरावा...
श्रीदेवीच्या आई आजारी पडल्यानंतर या लव्हस्टोरी महत्वाचे वळण आले. तिच्या आईवर अमेरिकेत उपचार सुरु होते. यादरम्यान बोनी कपूर यांनी श्रीदेवीला मानसिक, भावनिक आणि अर्थिक रुपात मदत केली होती. तिच्या आईचे कर्जसुध्दा बोनी यांनी फेडले होते. श्रीदेवी त्यांच्या या कामाने खूप प्रभावित झाली आणि बोनीच्या प्रेमाला होकार दिला.
बोनी आणि मोना यांचे कमकुवत पडलेले नाते अखेर संपुष्टात आले. 1996मध्ये श्रीदेवी आणि बोनी यांनी लग्न केले. दोघांना जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत. या वर्षी त्यांच्या वैवाहिक आयुष्याला 20 वर्षे पूर्ण झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचे निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...