आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतरसुध्दा शत्रुघ्न यांचे रिनासोबत होते संबंध, पत्नीला सर्वकाही होते ठाऊक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: शत्रुघ्न सिन्हा, पूनम सिन्हा, रिना रॉय
मुंबई- बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आज 70 वर्षांचे झाले आहेत. 9 डिसेंबर 1945ला पाटण्यात जन्मलेले शत्रुघ्न सिन्हा राजकिय क्षेत्रातसुध्दा सक्रिय आहेत. पारस (1971), दोस्त (1974), काला पत्थर (1979), दोस्ताना (1980)सारख्या सिनेमांतून आपल्या अनोख्या अभिनयाचा झेंडा रोवणा-या शत्रुघ्न यांचा आयुष्यसुध्दा खूप चर्चित राहिले आहे. शत्रुघ्न यांनी 1980मध्ये माजी मिस यंग इंडिया राहिलेल्या पूनम चंडीरामणि (आता सिन्हा) यांच्याशी लग्न केले. याच काळात शत्रुघ्न यांचे नाव अभिनेत्री रिना रॉयसोबत जुळले होते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते, की रिनासोबत त्यांचे नाते 7 वर्षे होते. विशेष म्हणजे, शत्रुघ्न यांची पत्नी पूनम यांना या अफेअरविषयी सर्वकाही ठाऊक होते.
शत्रुघ्न यांच्या लग्नाने अचंबित झाल्या होत्या रिना-
बॉलिवूडमध्ये रिना यशोशिखरावर होत्या, त्यावेळी त्यांचे अफेअर शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत होते. काही कामानिमित्त रिना लंडन गेल्या होत्या. त्यावेळी शत्रुघ्न यांनी पूनमसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. रिना यांना या लग्नाविषयी माहित झाल्यानंतर त्या भडकल्या आणि भारतात येऊन याचे उत्तर मागितले. लग्नाच्या अनेक वर्षांनंतरसुध्दा शत्रुघ्न रिना यांना भेटत होते. परंतु या नात्याचा दु:खद अंत झाला. दोघांचे नाते का संपुष्टात आले, याचे उत्तर आजही कुणाकडे नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, शत्रुघ्न सिन्हा आणि रिना रॉय यांची लव्ह-स्टोरी...
बातम्या आणखी आहेत...