आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lulia Vantur Is Enjoying Holidays At Salman Khan\'s Farmhouse

सलमान खानच्या फार्महाऊसवर सुट्या एन्जॉय करतेय मैत्रीण लूलिया!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सलमान खान आणि लुलिया वेंचूर)
 
मुंबई- बातमी आहे, की रोमानियाची मॉडेल आणि टीव्ही होस्ट लुलिया वेंचूर सध्या बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या फार्महाऊसवर सुट्या घालवत आहे. माध्यमांच्या रिपोर्ट्नुसार, लुलियाला अलीकडेच सलमानच्या कुटुंबीयांसोबत त्याच्या फार्महाऊसवर पाहिल्या गेले आहे. मात्र अद्याप स्वत: सलमान अथवा खान कुटुंबीयांकडून याबाबत काहीच प्रतिक्रिया आलेली नाहीये. लुलियाचे नाव सलमानसोबत नेहमी जुळत आलेले आहेत. काही महिन्यांपूर्वी अशी बातमी आली होती, की सलमान लुलियासोबत लग्नाचे प्लानिंग करत आहे. तसे पाहता लुलिया खान कुटुंबासोबत नेहमी वेळ घालवताना दिसते. माध्यमांमध्ये लुलियाची खान कुटुंबीयांसोबतची काही छायाचित्रे समोर आली होती. 
 
2006मध्ये टीव्ही इंडस्ट्रीशी जोडल्या गेली लुलिया- 
पेशाने मॉजेल लुलियाने 2006मध्ये टीव्हीकडे कल दाखवले. त्यांनी PRO टीव्हीसाठी सकाळच्या बातम्या होस्ट केला आहे. ती आठवड्याच्या शेवटी सकाळी बातम्या वाचत होती आणि वर्षातून एक मोठा कार्यक्रम होस्ट करत होती. लुलियाने स्टिफन बनीकासोबत डान्सिंग प्रोग्रामसुध्दा केला आहे. ती स्पोर्ट्सची समर्थक आहे. जेव्हा ती लहान होती, तेव्हा व्हॉलीबॉल खेळत होती. ती टेनिस आणि बॉस्केबॉलसुध्दा खेळायची. तिने मागील वर्षी \'ओ तेरी\' सिनेमात आयटम नंबर केला होता. हा सिनेमाला सलमानचा भावोजी अतुल अग्निहोत्रीने निर्मित केला होता.  
 
विवाहित आहे लुलिया
लुलियाचे लग्न रोमच्या मारियस मोगासोबत झाले आहे. मारियस मोगा गीतकार, गायक आणि निर्माता आहे. तो यूरोपमध्ये राहतो. लुलिया आणि मारियसचे लग्न 7 ऑगस्ट 2012ला झाले. बातम्यांनुसार दोघांमध्ये दिर्घकाळापासून नाते आहे. त्यांच्या रोमान्सच्या बातम्या त्यांच्या शहरांत नेहमी चर्चेत होत्या. सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकवर या रोमनिया जोडीविषयी घोषित करण्यात आले आहे, की त्यांचे लग्न झाले आहे. फेसबुकवर 7 ऑगस्ट 2012ला जो फोटो पोस्ट करण्यात आला आहे, त्यामध्ये दोघे लिप-लॉक करताना दिसले होते. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लूलियाचे सलमानच्या कुटुंबीया आणि पतीसोबतचे काही फोटो...