आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lulia Vantur Spotted With Salman Khan In Uttar Pradesh

3 दिवस सलमानसोबत राहिली 'GF' लुलिया, इंस्टाग्रामवर लिहिले, 'LOVE IS BLIND'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानसोबत त्याची कथित गर्लफ्रेंड लुलिया वेंचूर स्‍पॉट झाली आहे. - Divya Marathi
सलमान खानसोबत त्याची कथित गर्लफ्रेंड लुलिया वेंचूर स्‍पॉट झाली आहे.
मेरठ: 19 एप्रिलपासून 21एप्रिलपर्यंत मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या 'सुल्तान' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानची कथित गर्लफ्रेंड लुलिया वेंचूरसुध्दा त्याच्यासोबत होती. मात्र, यादरम्यान ती फार्म हाऊसवर थांबलेली होती. शुक्रवारी (22 एप्रिल) दिल्लीहून परतत असताना ती कारमध्ये सलमानसोबत दिसली.
3 दिवस सलमानसोबत राहिली लुलिया?
- लुलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात ती एका फार्म हाऊसमध्ये बसलेली दिसतेय.
- इतकेच नव्हे तर तिने लिहिले, 'LOVE IS BLIND'. विशेष म्हणजे, 'सुल्तान'च्या शूटिंगदरम्यान सलमान एखाद्या हॉटेलमध्ये नव्हे फार्महाऊसवर थांबला होता.
- शिवाय सलमानसोबत कारमध्ये दिसलेल्या लुलियाने तोच ड्रेस परिधान केला होता, जो इंस्टावर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये दिसतोय. लुलियाने निळ्या रंगाचे डिझाइन असलेला सफेद कुर्ता परिधान केलेला होता.
- इतकेच नव्हे तर सलमान ज्या फार्महाऊसवर थांबलेला होता, त्याचे लोकेशन लुलियाने पोस्ट केलेल्या फोटोमधील फार्महाऊसशी मिळते-जुळते आहे.
अखेर कुठला आहे हा फोटो?
- या फोटोच्या लोकेशनवरून बरीच चर्चा रंगली आहे. सध्या फोटोंमधील लोकेशनमुळे कन्फ्यूजन आहे.
- काहीजण मेरठ तर काहीजण दिल्लीचे एक अज्ञात ठिकाण असल्याचे सांगत आहेत.
- काही रिपोर्ट्समध्ये फोटो रंणथम्बोरचा (राजस्थान) असल्याचे सांगितले जाते आहे. या फोटोंमध्ये बीना काकसुध्दा दिसत आहेत.
- त्या सलमानची ऑनस्क्रिन आई आहे आणि त्या राजस्थानच्या आहेत. सलमान अनेकदा त्यांच्या घरी जात असतो.
कशी झाली पहिली भेट?
एका लोकप्रिय वेबसाइटमध्ये छापलेल्या बातमीनुसार, सलमान आणि लुलियाची पहिली भेट रोमानियामध्ये झाली होती. भाऊ सोहेल खानच्या 'जय हो' सिनेमासाठी सलमानचा रोमानियामध्ये लोकेशन शोधत होता. तेव्हा तो लुलियाला भेटला. काही वेळ दोघे सोबत राहिले आणि त्यांची बाँडिंग झाली. त्यामुळे रोमानियाहून परतल्यानंतरसुध्दा सलमान लुलियाच्या टचमध्ये राहिला.
कोण आहे लुलिया? कसे झाले तिचे लग्न? जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...