आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी आहे 244 कोटींच्या संपत्तीचा मालक असलेल्या सलमान खानची Luxurious Life

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सलमान खान, शेजारी वांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेंट)
मुंबईः 13 वर्षे जुन्या हिट अँड रन प्रकरणाचा निकाल आला असून अभिनेता सलमान खानला सेशन कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल आल्यानंतर सलमानने हायकोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्याला दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. आता शुक्रवारी काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्टारडम आणि फॅन फॉलोईंगच्या बाबतील सलमान इंडस्ट्रीच्या इतर खान्सपेक्षा आघाडीवर आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत त्याची तुलना सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत होते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये बॉडी बनवणे, शर्टलेस होणे आणि 100 कोटी क्लबसारखा ट्रेंड सुरू करण्याचे श्रेय सलमानलाच जाते. स्पष्ट आहे, की सुपरस्टार होण्याच्या नात्याने सलमानचे कोटींचे बँक बॅलेन्ससुध्दा आहे. जानेवारी 2014 मध्ये एका आंतरराष्ट्रीय मॅगझिनने जाहीर केलेल्या आकड्यांनुसार, सलमान खानची मालमत्ता 244.2 कोटी सांगण्यात येते.
100 कोटी क्लबचे श्रेय-
मागील काही वर्षांमध्ये सलमान खानचे सर्वाधिक सिनेमे 100 आणि 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. त्यामध्ये दबंग (2010), बॉडीगार्ड (2011), एक था टाइगर (2012), दबंग 2 (2012), जय हो (2014), किक (2014)सारखे सिनेमे आहेत. इतके सिनेमे 100 कोटी क्लबमध्ये सामील होणारा सलमान पहिलाच अभिनेता आहे.

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या सलमानच्या मानधन आणि लग्झरी लाइफस्टाइलविषयी...