आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूळची नागपूरची ही मॉडेल पहिल्याच अॅडमध्ये झाली होती न्यूड, आता आहे अज्ञातवासात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिध्द सुपरमॉडेल मधु सप्रेचा आज 44वा वाढदिवस आहे. तिचा जन्म 14 जुलै 1971 रोजी नागपूर येथे झाला. मधु बालपणी क्रीडापटू होती, परंतु कमी वयातच मॉडेलिंगमध्ये पाऊल ठेवून तिने कमी काळातच लोकप्रियता मिळवली. मिस इंडिया टायटल नावी करूनसुध्दा मधु ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये करिअर करू शकली नाही. तिने एका जाहिरातीत न्यूड होऊन पोज दिल्या होत्या, ही जाहिरात रिलीज होण्यापूर्वी बॅन झाली होती. आता मधु लाइमलाइटपासून दूर इटलीमध्ये आयुष्य घालवत आहे.
1992मध्ये बनली होती मिस इंडिया-
मॉडेल म्हणून मधु सप्रेला ओळख आणि लोकप्रियता 1992मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर मिळाली. त्यानंतर तिने मिस यूनिव्हर्स स्पर्धेतसुध्दा तिसरे स्थान मिळवले. बातम्यांनुसार, मधु त्यावर्षी मिस यूनिव्हर्स टायटलमध्ये सर्वात उठून दिसणारी स्पर्धक होती. परंतु ती परिक्षकांच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर देऊ शकली नाही. त्यामुळेच तिला संकेड रनर-अपचे स्थान मिळाले होते.
केवळ एका सिनेमात केले काम-
तसे पाहता, मधुने अनेक मॉडेल ब्यूटी कॉन्टेस्टचा किताब जिंकल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते. परंतु तिला बॉलिवूडमध्ये करिअर बनवण्यात काहीच रुची नव्हती. तिने केवळ 2003मध्ये आलेल्या 'बूम' सिनेमात काम केला.
जाहिरातीसाठी झाली न्यूड-
मधु सप्रे आणि मॉडेल, अभिनेता मिलिंद सोम यांची 1995मध्ये आलेली टफ शूजची जाहिरात सर्वात वादग्रस्त जाहिरात मानली जाते. रिलीज होताच ही जाहिरात बॅन करण्यात आली होती. या जाहिरातीमध्ये दोघांनी केवळ शूज घातलेले होते आणि शरीरावर एक अजगर लटकवलेला होता. न्यूड पोज देऊन मधु आणि मिलिंदने खळबळ उडवली होती. त्यानंतर दोघांना अनेक कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्या होत्या.
इंडियाहून पोहोचली इटलीला-
मधुने 2001मध्ये इटलीचा बिझनेसमन जिआन मारियासोबत लग्न केले. आता ती इटलीमध्ये राहत आहे. मधु आणि जिआन यांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न केले होते. मधु एका मुलीची आई आहे, तिच्या मुलीचे नाव इंदीरा आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मधुचे ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये असतानाचे फोटो...