आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिस युनिव्हर्स स्पर्धेतील एका उत्तराने गमावला होता मुकुट, नंतर बनली भारतातील सर्वात बोल्ड मॉडेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क  -  भारतातील सर्वात बोल्ड मॉडेल्सपैकी एक असलेली मधु सप्रे आज तिचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. 14 जुलै 1971 साली जन्मलेल्या मधु सप्रेचा जन्म नागपूर येथे झाला. 1992 साली फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकणारी मधुने फार कमी वयातच मॉडेलिंग क्षेत्रात चांगलेच नाव कमावले होते. 
 
बोल्ड जाहिरातीमुळे आली होती चर्चेत..
मधु सप्रे आणि मिलिंद सोमण या दोन नावांनी मॉडेलिंगजगतात खळबळ उडवून दिली होती जेव्हा त्यांनी एका जाहिरातीत नग्नावस्थेत फोटोशूट केले होते. एका शूज कंपनीच्या जाहिरातीत त्यांनी केवळ पायात बुट आणि गळ्यात अजगर असे फोटोशूट केले होते. यानंतर या जाहिरातीवर बॅनही लावण्यात आला होता. 
 
ब्युटी काँटेस्टमध्ये एका प्रश्नाने गमावला होता मुकुट..
जर तु देशाची पंतप्रधान बनलीस तर काय करशील असे जेव्हा तिला विचारण्यात आले तेव्हा मधुने तिला एक मोठे स्टेडियम बनवायला आवडेल असे उत्तर दिले. यामुळे तिने मुकुट गमावला अशी चर्चा झाली होती. मधुने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले, "प्रामाणिकपणे उत्तर द्यावे असे सांगण्यात आले होते आणि त्यामुळेच आपण भारतासारख्या देशात जिथे खेळाला प्रोत्साहन दिले जात नाही त्यासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली पण तेव्हा पॉलिटीकली करेक्ट उत्तर द्यायचे होते हे माहीत नसल्याने मुकुट गमावला. पण मनापासून जे वाटले त्याचे प्रामाणिक उत्तर दिल्याने आपणास खंत नाही" असेही तिने सांगितले.
 
इंग्लिश कच्चे असल्याने नीट सांगू शकली नाही मुद्दा..
मधू रॅम्पवॉक, लुक्स या सर्वबाबतीत एकदम परफेक्ट होतील पण इंग्रजी कच्चे असल्याने तिने दिलेल्या उत्तराचे पूर्ण स्पष्टीकरण देऊ शकली नव्हती असे मधूने सांगितले. 
 
मिलिंद सोमणसोबत होते अफेअर..
मॉडेलजगतातील सर्वात बोल्ड कपल म्हणून मधु सप्रे आणि मिलींद सोमण प्रसिद्ध होते. 90 च्या दशकात लीव-इन मध्ये राहत असल्याचे त्यांनी कबुल केले होते. मधु सप्रे आणि मिलींद सोमण यांची मोठी फॅन फॉलोइंग होती. काही वर्षे डेट केल्यानंतर या दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या तेव्हा संपूर्ण मॉडेलिंगजगताला विश्वास बसला नाही. एका मुलाखतीत मिलींदने सांगितले होते की, "मधु ही पहिली मुलगी होती जिला मी प्रपोज केले होते आणि जिच्याशी मला लग्न करायचे होते."
 
इटालियन बिजनेसमनसोबत केले लग्न..
मिलिंद सोमणसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मधूने इटलीतील बिजनेसमन जियान मारीया एमेंडॅटरीसोबत 2001 साली लग्न केले. त्यांना मुलगी आहे. लग्नानंतर मधू आता इटलीत सेटल झाली आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, मधु सप्रेचे काही खास Photos...
बातम्या आणखी आहेत...