आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

29 वर्षापासून अज्ञातवासात आहे महाभारताची 'कुंती', 70 च्या दशकात दिले होते बिकीनी सीन्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बीआर चोप्रा यांची प्रसिद्ध मालिका 'महाभारत'(1988-90) तर प्रत्येकाने पाहिले असेल. मालिकेतील भीष्म, दुर्योधन, अर्जुन आणि शकुनीने घराघरात लोकप्रियता मिळवली होती. पण यातील एक कॅरेक्टर होते 'कुंती'चे जे अभिनेत्री नाजनीन यांनी केले होते. असे म्हणतात की, चित्रपट मिळणे बंद झाले असल्याने नाजनीनने टीव्हीमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. महाभारतात रोल केल्यानंतर नाजनीन जणु चित्रपटसृष्टीतून गायबच झाली. ती कुठे आहे याचा आजही कोणालाच थांगपत्ता नाही. नाजनीनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारायचे झाले तर त्याचीसुद्धा कुठेच माहिती नाही. 70 च्या दशकात बिकीनी घातल्याने प्रसिद्ध झाली होती नाजनीन..
 
- नाजनीनने फार कमी चित्रपटात लीड रोल केला आहे.
- तिला अनेक चित्रपटात हिरो-हिरोईनच्या बहिणीचे रोल मिळायचे. यामुळे नाजनीन दुःखी राहत असे.
- 'चलते चलते'(1976) या चित्रपटात बिकीनी सीन करुन नाजनीनने बरीच प्रसिद्दी मिळवली.
- हा चित्रपट हीरो विशाल आनंदमुळे हिट ठरला. 
- त्याचदरम्यान तिचा  'सा-रे-गा-मा-पा' 1972 साली रिलीज झाला होता. हा चित्रपट सत्येन बोसने डायरेक्ट केला होता. यासोबतच त्यांनी अजून दोन चित्रपट साईन केले होते पण ते चित्रपट कधी बनले नाही.
 
नाजनीनला बनायचे होते एअर होस्टेस..
- नाजनीनला अभिनेत्री नव्हे एअर होस्टेस बनायचे होते. 
- नाजनीनची आई फ्लाईटला घाबरत असे त्यामुळे नाजनीनने तिला मिळत असलेल्या चित्रपटाची ऑफर स्वीकारली.
- दिग्दर्शकांना वाटायचे नाजनीन जया बच्चन यांच्यासारखी दिसते यामुळे काही चित्रपटात नाजनीनला जया यांच्या बहिणीचे रोलही मिळाले.
- 'कोरा कागज'(1974) नंतर दिग्दर्शक तिच्याकडे केवळ बहिणीचे रोल घेऊन येऊ लागले पण नाजनीनला लीड रोल करायचे होते. 
- नाजनीनने काही बी ग्रेड चित्रपटात कामही केले यामुळे तिची इमेज खराब झाली. 
- नाजनीनचे करीअर लहान होते. तिने केवळ 22 चित्रपटात काम केले ज्यात चलते-चलते' हिट ठरला. 
- यानंतर तिने 'पंडित और पठान'(1977), 'हैवान'(1977) आणि 'कोरा कागज'(1974) या चित्रपटांत काम केले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, नाजनीनचे 10 PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...