मुंबई - 1 मार्च रोजी वयाची 45 वर्षे पूर्ण केलेल्या नम्रता शिरोडकरचे नुकतेच काही लेटेस्ट फोटोज् समोर आले आहेत. यात ती एकदम बाल्ड लुकमध्ये दिसून येत आहे. नम्रताने 1998 साली सलमान खानच्या जब प्यार किसी से होता हे या चित्रपटातून डेब्यू केला होता. पण तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती 1999 साली वास्तव चित्रपटातील अभिनयाने. यात तिने संजयच्या प्रेयसीची भूमिका केली होती जी वेश्या असते. यानंतर नम्रताने अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले पण तिला हवे तसे यश मिळाले नाही. मिस इंडिया बनली होती नम्रता शिरोडकर..
22 जानेवारी 1972 रोजी जन्मलेली नम्रता 1993 साली मिस इंडिया हा किताब जिंकली होती. त्यानंतर मिस युनिव्हर्स स्पर्धेतही ती पाचव्या क्रमांकावर होती. मिस इंडिया किताब जिंकल्यानंतर तिने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली आणि नंतर हिंदी चित्रपटसृष्टीत आली. तिने 'पुकार', 'वास्तव', 'हेरा फेरी', 'अस्तित्व', 'कच्चे धागे', 'तेरा मेरा साथ रहे', 'LOC कारगिल' यांसारख्या चित्रपटात भूमिका केल्या. पण हवे तसे यश तिला मिळाले नाही.
३ वर्षाने लहान महेश बाबूसोबत केला आहे विवाह..
बॉलिवूडमध्ये अपयशी ठरल्यानंतर नम्रताने साऊथ चित्रपट करण्यास सुरुवात केली. 2000 साली तेलुगू चित्रपट ‘वामसी’च्या शूटिंगदरम्यान तिची ओळख महेशबाबूसोबत झाली. काही वर्षे डेटींग केल्यानंतर तिने फेब्रुवारी 2005 साली लग्न केले. महेश बाबू नम्रतापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे.
पुढच्या स्लाईडवर वाचा, नम्रताविषयी काही खास गोष्टी..