आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेश भट्टना म्हणाल्या होत्या स्मिता पाटील, 'चांगल्या रोलबरोबर पैसेही मिळतील!'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्मिता पाटील आज आपल्यात असत्या तर त्यांनी 62 वा वाढदिवस साजरा केला असता. महेश भट्‌ट यांच्या करिअरचा पहिला यशस्वी आणि वाहवा मिळवलेला चित्रपट होता, 'अर्थ'. या चित्रपटात स्मिता यांच्या अभिनयाने चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेले होते. महेश भट्‌ट स्मिता यांचे चांगले मित्र होते, आजही स्मिता त्यांच्या कायम स्मरणात असतात. महेश भट्ट जेव्हा जुन्या आठवणी जागवतात तेव्हा स्मिता त्यांच्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. महेश भट्ट यांच्या मते, 'अर्थ'ची कथा ऐकूण स्मिता फार भावूक जाल्या होत्या. त्यावेळी सहज त्यांच्या तोंडातून निघाले होते, 'ही भूमिका जीवंत करण्यासाठी मी माझे सर्वकाही पणाला लावेल' 

महेश भट्ट यांनी दिले होते 10 हजार रुपए...
त्यानंतर 10 हजार रुपये देत महेश भट्ट यांनी स्मिता यांच्याकडे एक कागद दिला आणि म्हटले हे तुमचे साइनिंग अमाऊट आहे. तुम्ही या कॉन्ट्रॅक्ट लेटरवर साईन करा. त्यावर स्मिता यांना आश्चर्य वाटले होते. त्या म्हणाल्या, म्हणजे चांगल्या रोलबरोबर मला पैसेही मिळतील का! ही भूमिकाच माझ्यासाठी पेमेंट नाही का! 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या स्मिता यांच्याबाबच्या आणखी काही आठवणी.. 
 
 
बातम्या आणखी आहेत...