Home »Gossip» Mahima To Sridevi Actresses Who Got Pregnant Before Marriage

महिमा, कोंकणा, श्रीदेवी.. लग्नाआधी प्रेग्नेंट असणाऱ्या अॅक्ट्रेसेसची यादी आहे मोठी

दिव्य मराठी वेब टीम | Sep 13, 2017, 08:00 AM IST

एंटरटेनमेंट डेस्क - आज महिमा चौधरीचा वाढदिवस आहे. महिमाचे खरे नाव ऋतू चौधरी असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. 13 सप्टेंबर 1973 रोजी दार्जिलिंगमध्ये तिचा जन्म झाला. महिमाने आपले मॉडेलिंग करिअर ऋतू चौधरी नावाने सुरु केले होते. 'परदेस' सिनेमात सुभाष घईने तिला भूमिकाच नव्हे महिमा हे नावदेखील दिले. 'परदेस' सिनेमात काम करण्यापूर्वी महिमा एका जाहिरातीतसुध्दा झळकली आहे. याच जाहिरातीत महिमाला पाहून सुभाष घई यांनी तिला आपला सिनेमा साइन करून घेतला होता.

लग्नाआधीच गेले होते दिवस...
अलीकडेच एका मुलाखतीत महिमाने तिच्या भूतकाळाविषयी सांगितले. लग्नापूर्वी महिमा लिएंडर पेससोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र लिएंडरसोबत तिचे नाते फार काळ टिकले नाही. लिएंडरपासून विभक्त झाल्यानंतर महिमाने २००६ मध्ये मुंबईतील आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले आणि लग्नाच्या काही महिन्यात तिने मुलीला जन्म दिला. महिमा लग्नापूर्वीच प्रेग्नेंट होती, असे म्हटले जाते. २०१३ मध्ये बॉबी आणि महिमा विभक्त झाले. महिमा सिंगल मदर असून मुलगी अरियानीचे संगोपन एकटीच करत आहे.
एकमेव महिमाच नव्हे तर बॉलिवूडच्या अशा आणखी काही अभिनेत्री आहेत, ज्यांना लग्नाआधीच दिवस गेले होते.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, कोण आहेत या अभिनेत्री...

Next Article

Recommended