आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahira Has The Most Kick Ass Response To Her Shiv Sena Ban

पाकिस्तानी अॅक्ट्रेस माहिरा खानने शिवसेनेला लगावला उपरोधिक टोला, जाणून घ्या काय म्हणाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक असीम रजा यांच्यासोबत माहिरा खान - Divya Marathi
दिग्दर्शक असीम रजा यांच्यासोबत माहिरा खान

नवी दिल्ली : पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने अलीकडेच आपल्या ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला असून यामध्ये तिने शिवसेनेच्या विरोधाला उपरोधिक टोला लगावला आहे. रंजक गोष्ट म्हणजे तिने रागात शब्दांचे बाण न सोडता एका फोटोच्या माध्यमातून शिवसेनेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
कॅटवुमन बनलेल्या माहिरा खानने काही दिवसांपूर्वीच लाहोरमधील हॅलोविन पार्टीत हजेरी लावली होती. पण सगळ्यांची नजर माहिरापेक्षा तिच्यासोबत असलेल्या एका दिग्दर्शकावर गेली. दिग्दर्शक असीम रजा यांनी भगवे वस्त्र परिधान केले होते आणि माहिरासोबत फोटोसाठी पोज दिली होती. यावेळी त्यांच्या हातात एक छोटे पोस्टर होतं, त्यावर लिहिले होते, ‘माहिरा को बाहर निकालो.’
शिवसेना मागील काही दिवसांपासून पाकिस्तानी कलाकारांना विरोध करत आहे. गझल गायक गुलाम अली यांच्यानंतर फवाद खान आणि माहिरा खानला महाराष्ट्रात काम करु देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. माहिरा खान सुपरस्टार शाहरुख खानच्या ‘रईस’या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण करणार आहे.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, कॅटवुमन बनलेल्या माहिराचे आणखी एक छायाचित्र...