आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mallika Sherawat On Cannes Film Festival Red Carpet

Cannes: मल्लिका यंदाही रेड कार्पेटवर दाखवणार जलवा, पाहा आत्तापर्यंतचे खास अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरील मल्लिकाचे वेगवेगळे अंदाज)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत फ्रान्समध्ये सुरु झालेल्या 68 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणारेय. याची माहिती स्वतः मल्लिकाने ट्विटरच्या माध्यमातून दिली. तिने ट्विट केले, ''कान्स मी येतेय.''
तिने पुढे ट्विट केले, ''68 व्या कान्समध्ये फिक्कीच्या वतीने आमंत्रित करण्यात आल्याने गर्व वाटतोय. पॅनल डिस्कशनमध्ये सहभागी होणार असल्याचा आनंद आहे.''
13 मे ते 24 मे या काळात फ्रान्समध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हल सोहळा रंगणारेय. या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ रेड कार्पेटवर अवतरली होती. कतरिनानंतर आता ऐश्वर्या राय बच्चन, सोनम कपूर आणि मल्लिका शेरावत या अभिनेत्री कान्सच्या रेड कार्पेटवर आपला जादू दाखवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, गेल्या काही वर्षांत कान्सच्या रेड कार्पेटवर क्लिक झालेली मल्लिकाची छायाचित्रे...