आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी चेहऱ्यामुळे रिजेक्ट झाला होता हा सुपरस्टार, आज दाराशी आहेत 369 कारचे कलेक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साऊथ चित्रपटाचे सुपरस्टार मामूटी आज त्यांचा 66 वा बर्थ डे सेलिब्रेट करत आहेत. 20 वर्षाचे असताना अॅक्टिंग करिअरला सुरुवात करणाऱ्या मामूटी यांनी चित्रपटात येण्यासाठीस फार संघर्ष केला आहे. शिक्षण सुरु असतानाच त्यांनी चित्रपटात काम करणे सुरु केले पण काही दिग्दर्शकांनी त्यांना असे म्हणून रिजेक्ट केले की, त्यांचा चेहरा आणि आवाज योग्य नाही. पण तरीही त्यांनी हार मानली नाही आज त्यांची गणना साऊथच्या सुपरस्टार्समध्ये केली जाते. 369 कारचे मालक आहेत मामूटी..

मामूटी यांच्याजवळ एक दोन नव्हे तब्बल 369 कार आहेत. मामूटी यांनी काही वर्षापूर्वी देशातील पहिली मारुती खरेदी करण्याची इच्छा प्रकट केली होती. मामूटी यांनी त्यांच्या कारसाठी खास गॅरेज बनवले आहे. ते स्वतः कार ड्राईव्ह करतात. मामूटी यांच्याजवळ जॅग्वार XJ-L (कैवियर), टोयोटा लैंड क्रूज़र LC 200, फरारी, मर्सडीज और ऑडी के कई मॉडल, पोर्श, टोयोटा फॉर्च्यूनर, Mini Cooper S, F10 BMW 530d और 525d, E46 BMW M3, Mitsubishi Pajero Sport,फॉक्सवैगन पैसेट X2 और कई SUV's यांसारख्या कारचे कलेक्शन आहे. 
 
शेतकरी होते मामूटी यांचे वडील..
मामूटी यांचा जन्म 7 सप्टेंबर 1951 रोजी चंदिरूर, आलप्पुषा जिला, केरळ येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मुहम्मद कुट्टी इस्माइल पानीपराम्बिल आहे. पण चित्रपटांसाठी त्यांनी त्यांचे नाव मामूटी ठेवले. ते घरात सर्वात मोठे आहेत. त्यांना दोन लहान भाऊ आणि बहीण आहे. 1960 साली ते एर्नाकुलमला कुटुंबासोबत शिफ्ट झाले. त्यांनी येथेच एलएलबीचे शिक्षण घेतले. 
 
लहानपणापासूनच होता अभिनयाचा शौक..
लहानपणापासून मामूटी यांना अभिनयाचा शौक होता. त्यांनी अगोदरच ठरवले होते की त्यांना अभिनयात करिअर करायचे आहे. त्यांनी 1971 साली 'अनुभवांगल पालीचकल' या चित्रपटात काम केले. त्यानंतर त्यांनी 'कालाचक्रम' (1973), 'देवलोकम' (1979) या चित्रपटात काम केले. पण हे चित्रपट रिलीज झाले नाही. 
 
 
मामूटी यांचा पहिला रिलीज झालेला चित्रपट 'विलक्कांउन्दु स्वप्नंगल' (1980) होता. 1981 साली त्यांना 'अहिंसा' चित्रपटासाठी बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरअवॉर्डही मिळाला. त्यांनी 1984 से 1993 पर्यंत जवळपास 150 चित्रपटात का केले. 1986 दरम्यान त्यांनी 35 चित्रपटात काम केले. त्यांनी 'थीरम तेंदुन्ना थीरा' (1983), 'रुग्मा' (1983), 'कोट्टायम कुंजाचान' (1990), 'कनलकट्टू' (1991), 'सागरम साक्षी' (1994), 'राजमनिक्यम' (2005), 'मिशन 90 डेज' (2007), 'द ट्रेन' (2011), 'फेस 2 फेस' (2012) यांसारख्या चित्रपटात काम केले. मामूटी यांनी आतापर्यंत 300 चित्रपटात काम केले आहे. त्यांना आतापर्यंत 3 नॅशनल अवॉर्ड, 7 केरळ स्टेट फिल्म अवॉर्ड आणि 13 फिल्मफेयर अवॉर्ड मिळाले आहेत. 
 
मोहनलाल आहे खास मित्र..
मामूटी आणि साउथ अभिनेता मोहनलाल चांगले मित्र आहेत. दोघांनी 56 चित्रपटात सोबत काम केले आहे आणि हे सर्व ब्लॉकबस्टर ठरले आहेत. मामूटी यांना सिगरेट पिण्याचे व्यसन होते पण त्यांनी नंतर मुलांसाठी हे व्यसन सोडले. मामूटी 256 कोटींचे मालक आहेत. पनाम्पिल्ली नगर, एर्नाकुलम येथे त्यांचा मोठा बंगला आहे. 2011 साली त्यांच्या घरात रेड पडली होती. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, मामूटी यांचे कार कलेक्शन..
बातम्या आणखी आहेत...