आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mamta Kulkarni Controversial Journey From Bollywood To Spirituality

90\'s च्या या प्रसिद्ध अॅक्ट्रेसच्या आयुष्याला आहे वादाची किनार, ग्लॅमरस आयुष्य सोडून बनली साध्वी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'आशिक आवारा', 'करण अर्जुन' यांसारख्या सिनेमांमध्ये काम करणारी बोल्ड आणि ग्लॅमरस अॅक्ट्रेस ममता कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ठाणे पोलिसांनी पकडलेल्या दोन हजार कोटींच्या एफेड्रिन ड्रग प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. गुजरातच्या माजी आमदाराच्या मुलाचं नाव समोर आल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक नाव समोर आलं आहे. ते नाव म्हणजे अभिनेत्री ममता कुलकर्णीचा पती विकी गोस्वामी होय.
विकी सध्या केनियात असल्याचं समजतंय. ठाणे पोलिसांनी 16 एप्रिलला तब्बल 18 टन वजनाचं सुमारे 2 हजार कोटी रुपयांचं एफेड्रिन ड्रग जप्त केलं होतं. इतका मोठा साठा सापडल्याने देशभरात खळबळ उडाली होती. ममता कुलकर्णीचा पती विकी गोस्वामी ड्रग्ज माफिया आहे. त्यामुळं ममताभोवती संशयाचं वलय निर्माण झालं आहे. पोलिस आता पुढील तपास करत आहेत.
बॉलिवूडमध्ये निर्माण केली खास ओळख...
ममता कुलकर्णी बॉलिवूडच्या एक अशी अभिनेत्री आहे, जिच्या अदांनी लाखो लोक घायल होत असे. वयाच्या 19 व्या वर्षी ममताने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिने 1992 मध्ये 'तिरंगा'मधून आपल्या करिअरची सुरूवात केली. या सिनेमापासूनच लोक तिच्या सौंदर्यांचे दिवाने झाले होते. तिच्याकडे अनेक सिनेमांचे ऑफर यायला लागल्या होत्या. 1993 च्या 'आशिक आवारा' या सिनेमाने ममताला स्टार बनवले. या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचा न्यू फेस अवॉर्ड मिळाला. त्यानंतर 'वक्त हमारा है', 'क्रांतीवीर', 'करण अर्जुन', 'बाजी' या सिनेमांमध्ये ती झळकली. 2002 मध्ये आलेला 'कभी तुम कभी हम' हा तिचा शेवटचा सिनेमा होता.
पुढे वाचा, राजकुमार संतोषींवर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप...
- आईवडिलांची होती राणी...
- ड्रग माफियासोबत लग्न...
- इश्वरावर आहे आता पहिले प्रेम... यांसह ममताविषयी बरेच काही...