आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mandakini Controversial Life Story From Bollywood Star To House Wife

B\'day : एकेकाळी दाऊदसोबत होते मंदाकिनीचे संबंध, 2010 मध्ये अपघातात झाले मुलाचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो- डावीकडे दाऊदसोबत मंदाकिनी, उजवीकडे (वर) -मुलगा आणि पतीसोबत (खाली) - पती आणि मुलीसोबत मंदाकिनी - Divya Marathi
फाइल फोटो- डावीकडे दाऊदसोबत मंदाकिनी, उजवीकडे (वर) -मुलगा आणि पतीसोबत (खाली) - पती आणि मुलीसोबत मंदाकिनी
(फाइल फोटो- दाऊद इब्राहिम आणि अभिनेत्री मंदाकिनी)
ऐंशीच्या दशकात ग्लॅमरस रुपात आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मंदाकिनी आज आपला 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात 1985 मध्ये 'अंतारेर भालोबाशा' या बंगाली सिनेमाद्वारे केली होती. याचवर्षी 'मेरा साथी' या सिनेमाद्वारे मंदाकिनीने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. 1985मध्येच तिला आणखी दोन हिंदी सिनेमे मिळाले. ते म्हणजे 'आर पार' आणि 'राम तेरी गंगा मैली' हे सिनेमे होते.
राज कपूर यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला 'राम तेरी गंगा मैली' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या सिनेमाने मंदाकिनीचे करिअर यशोशिखरावर नेले. या सिनेमात मंदाकिनीने दिलेल्या बोल्ड सीन्सची चर्चा आजही होते. बोल्ड सीन्स देण्यास मंदाकिनीने कधीही नकार दिला नाही, कदाचित त्यामुळेच तिचे करिअर वेगाने पुढे गेले.
1985 पासून सुरु झालेले मंदाकिनीचे करिअर 1996मध्ये 'जोरदार' या सिनेमाद्वारे संपुष्टात आले. सिनेमांपासून सन्यास घेण्याच्या दोन वर्षांपूर्वी तिचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत जुळले होते. क्रिकेटच्या मैदानात तिला अनेकदा दाऊदसोबत बघितले गेले. ऐंशीच्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मंदाकिनी आता तिब्बतन योगा क्लासेस चालवते. शिवाय ती दलाई लामा यांची फॉलोअरसुद्धा आहे.
आज मंदाकिनीच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिच्या फिल्मी करिअरसोबतच खासगी आयुष्याविषयीसुद्धा सांगत आहोत.
वयाच्या 16व्या वर्षी करिअरला सुरुवात
मंदाकिनीचा जन्म 20 जुलै 1969 रोजी मेरठमध्ये झाला. तिचे वडील जोसेफ ब्रिटिश नागरिक होते, तर आई मुस्लिम होती. मंदाकिनीचे बालपणीचे नाव यासमीन जोसेफ आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी मंदाकिनीने फिल्मी दुनियेत पदार्पण केले. 1985मध्ये रिलीज झालेल्या 'राम तेरी गंगा मैली' या सिनमात राज कपूर यांनी मंदिकिनीला पहिली संधी दिली. हा सिनेमा हिट ठरला. या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

'राम तेरी गंगा मैली'मधील चर्चित सीन्स
मंदाकिनीने 'राम तेरी गंगा मैली' या सिनेमाद्वारे करिअरला सुरुवात केली. राज कपूर यांचे दिग्दर्शन, दमदार कथा आणि सुपरहिट गाणी हे या सिनेमाचे वैशिष्ट्य होते. याशिवाय मंदाकिनीने आपल्या पहिल्याच सिनेमात बोल्ड सीन्स दिले होते.
बोल्ड सीन्समुळे झाला फायदा -
मंदाकिनीने 'राम तेरी गंगा मैली' या सिनेमात दिलेल्या बोल्ड सीन्सचा फायदा तिला पुढील चार वर्षांपर्यंत झाला. ती बॉलिवूडमधील अशी अभिनेत्री ठरली, जिच्याकडे सिनेमांची रीघ लागली होती. मंदाकिनीने 1986 मध्ये 6 सिनेमे, 1987मध्ये 6 सिनेमे, 1988मध्ये 8 सिनेमे आणि 1989मध्ये 8 सिनेमे केले.

1986 मध्ये आलेले मंदाकिनीचे सिनेमे -
1987 मध्ये मंदाकिनीने 6 सिनेमे केले होते- 1988 साली रिलीज झालेले मंदाकिनीचे 8 सिनेमे -
1989 मध्येसुद्धा मंदाकिनीने 8 सिनेमे केले होते -
सिम्हासनम (तेलगू सिनेमा) अपने अपने


प्यार मोहब्बत

नाग नागिन
ओम

लोहा जीते हैं शान से कहां है कानून
जीवा


प्यार करके देखो शूरवीर
आखिरी बाजी
आग और शोला डान्स डान्स
कमांडो जंग बाज
जाल हवालात
हम तो चले परदेश नाइंसाफी
मजलूम परम धरम मालामाल हिसाब खून का
- - तेजाब
देश के दुश्मन
- - अग्नि लडाई
गोविंदा आणि मिथून चक्रवर्तीसोबत जमली ऑन स्क्रिन जोडी -
मंदाकिनीचे करिअर यशोशिखरावर होते. 'राम तेरी गंगा मैली' या सिनेमाद्वारे प्रसिद्धीझोतात आलेल्या मंदाकिनीची ऑन स्क्रिन जोडी गोविंदा आणि मिथून चक्रवर्तीसोबत जमली. 1987 मध्ये मंदाकिनीने मिथून चक्रवर्तीसह 'डान्स डान्स' या सिनेमात काम केले. याचवर्षी तिचा गोविंदासोबत 'प्यार करके देखो' हा सिनेमा रिलीज झाला होता. हे दोन्ही सिनेमे बरेच गाजले होते.
1991 ते 1996 या काळात केवळ 2 सिनेमे -
दाऊदसोबत नाव जुळल्याचा परिणाम मंदाकिनीच्या करिअरवर झाला. अंडरवर्ल्डच्या या डॉनमुळे बॉलिवूडचा थरकाप उडायचा. त्यामुळे बरेच दिग्दर्शक मंदाकिनीसह काम करण्यास उत्सुक नव्हते. याच कारणामुळे ज्या मंदाकिनीने 1985 ते 1990 याकाळात तब्बल 37 सिनेमांत काम केले, ती 1991 ते 1996 या काळात केवळ दोनच सिनेमात झळकू शकली. 1991 मध्ये 'देशवासी' आणि 1996मध्ये 'जोरदार' या सिनेमात मंदाकिनी झळकली. जोरदार हा तिच्या करिअरमधील शेवटचा सिनेमा ठरला.
पुढे वाचा, दाऊदसोबत होते प्रेमसंबंध...