आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरहोस्टेसपासून बनली बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेलिंगसाठी ईराणहून आली भारतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंदाना करीमीचा जन्म तेहरानच्या एका मुस्लिम कुटुंबात झाला. - Divya Marathi
मंदाना करीमीचा जन्म तेहरानच्या एका मुस्लिम कुटुंबात झाला.
 
जयपुर: शनिवारी (30 एप्रिल) रात्री पिंकसिटीमध्ये झालेला फॅशन वीक बॉलिवूड कलाकारांच्या नावी होता. येथे बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री पोहोचल्या होत्या. त्यात एक अभिनेत्री होती मंदाना करिमी. मंदाना मूळ ईराणची आहे आणि बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करण्यासाठी ती भारतात आली. 
 
वडील भारतीय आणि आई ईराणी...
- करिमीचा जन्म तेहरानच्या एका मुस्लिम कुटुंबात झाला आहे. 
- तिचे वडील रेजा करिमी भारतीय असून आई सबा करिमी मूळची ईराणची आहे. 
- मंदनाचे बालपण तेहरानमध्ये गेले. एका मुलाखतीत तिने सांगितले होते, की तिचे कुटुंबीय खूप परंपरावादी आहेत. 
- त्यामुळे तिने तिचे बालपण कुटुंबातच घालवले. 
- त्यासोबतच तिने आर्ट्समधून पदवी शिक्षण घेतले आहे. ती नेहमी कुटुंबासोबत भारतात येते होती.
 
एअर होस्टेसच्या रुपात सुरु झाले करिअर...
- मंदनाने आपल्या करिअरची सुरुवात एअर होस्टेसच्या रुपात केली. 
- त्यासोबत ती छोटे-मोठे असाइंमेंटसुध्दा करत होती. 
- यादरम्यान तिने भारतातून अनेक मॉडेंलिंग ऑफर मिळाले, परंतु ती येथे आली नाही. 
- 2010मध्ये ती पहिल्यांदा तीन महिन्यांना असाइंमेंटवर भारतात आली होती. 
- त्यानंतर ती वारंवार कामानिमित्त भारतात येऊ लागली होती. यादरम्यान तिला मुंबई आवडू लागले. 2013मध्ये ती कायमची मुंबईला स्थायिक झाली. 
 
जयपूरला येऊन शेअर केले फोटो...
- मंदाना फॅशन वीकसाठी पहिल्यांदा जयपूरला आली होती असे नाहीये. 
- यापूर्वी ती ज्वेलरी शो आणि अनेक एग्झीबिशनसाठी जयपूरला येऊन गेली आहे. 
- यावेळीसुध्दा तिने जयपूरला आल्यापासून शोपर्यंतचे अनेक फोटो शेअर केले. 
 
मंदानाने केली बॉलिवूडमध्ये एंट्री...
- मंदानाने बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात \'रॉय\' सिनेमातून केली. परंतु \'बिग बॉस 9\'मधून ती लाइमलाइटमध्ये आली. 
- शिवाय ती \'भाग जॉनी भाग\', \'मै और चाल्स\' आणि एकता कपूरच्या \'क्या कूल है हम\' सिनेमात झळकली आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मंदानाचे ग्लॅमरस फोटो...
बातम्या आणखी आहेत...