आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: कॅन्सरने पालटले मनीषाचे रुप, 7 वर्षे लहान तरुणासोबत थाटला होता संसार, वाचा Facts

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दोन विविध छायाचित्रांमध्ये मनीषा कोईराला)
1991मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सौदागर' गाण्याच्या 'इलू इलू'मधून ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मनीषा कोईराला आज 45 वर्षांची झाली आहे. मनीषाने एक अभिनेत्री म्हणून हिंदी सिनेसृष्टीत चांगली ओळख निर्माण केली आहे.परंतु तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई म्हणजे तिने कर्करोगावर यशस्वीरित्या केलेली मात.
2012मध्ये मनीषाची तब्येत बिघडल्यानंतर तिला मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिला गर्भशयाचा कर्करोग असल्याचे उघडकिस आले होते. कर्करोगावर उपचार घेण्यासाठी मनीषाने काही दिवस न्यूयॉर्क गाठले. जवळपास एक वर्षांच्या वैद्यकिय उपचारानंतर ती पूर्णत: बरी झाली. तिला तिच्या आजारपणाविषयी विचारल्यानंतर तिने सर्व माहिती चाहतांना सोशल साइट्सवर दिली. सध्या ती बरी झाली असून आराम करत आहे.
कर्करोगाने करिअरला लावला ब्रेक
कर्करोगाला मात देत मनीषा आता ठणठणीत झाली आहे. परंतु या आजाराने तिच्या करिअरला ब्रेक लावला. मनीषाने 1991मध्ये 'सौदागर' सिनेमामधून करिअरला सुरुवात केली. 2012मध्ये रिलीज झालल्या तिने 'भूत रिटर्न्स'पर्यंत करिअर सुरु ठेवले होते. या 22 वर्षांच्या करिअरमध्ये तिने अनेक सिनेमांमध्ये काम केले. पण 2012मध्ये कर्करोगाच्या आजाराविषयी माहित झाल्याने तिने आपल्या अभिनयाची गाडी थांबवली. आता बरी झाल्यानंतर पुन्हा एकदा करिअरला सुरुवात करण्याचा मनीषाचा विचार आहे.
90च्या दशकातली सर्वात सुंदर अभिनेत्री
कर्करोगाने मनीषाच्या आयुष्यासह सौंदर्यातही बराच बदल झाला आहे. विशेषत: तिच्या चेह-यात मोठा बदल दिसून येत आहे. 90च्या दशकात तिला सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून निवडण्यात आले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा मनीषाच्या आयुष्यातील रंजक Facts...