एंटरटेनमेंट डेस्क - अभिनेता सलमान खानसोबत 'तेरे नाम' या सिनेमाद्वारे डेब्यू करणारी भूमिका चावला गेल्या नऊ वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. 21 ऑगस्ट 1978 रोजी जन्मलेल्या भूमिकाने 'तेरे नाम' या सिनेमात निर्जराची भूमिका साकारुन प्रसिद्धी मिळवली होती. 2007 मध्ये आलेल्या 'गांधी माय फादर' या सिनेमात ती शेवटची दिसली होती. त्यानंतर गेल्यावर्षी धोनी सिनेमात छोट्याशा भूमिकेत ती झळकली होती.
अनेक वर्षांचा गॅप..
भूमिकाने तेरे नाम या सिनेमानंतर 'रन', 'दिल ने जिसे अपना कहा', 'सिलसिले', 'दिल जो भी करे' या सिनेमांमध्ये काम केले. मात्र तिचे करिअर फारसे यशस्वी ठरले नाही. त्यानंतर तिने सिनेसृष्टीकडे पाठ फिरवली. योगा गुरु भरत ठाकूरसोबत भूमिकाचे लग्न झाले. त्यानंतर सुमारे नऊ ते दहा वर्षांनी तिने धोनी - द अनटोल्ड स्टोरी सिनेमानातू सुशांतसिंह राजपूतच्या बहिणीच्या रुपाने कमबॅक केले. पण भूमिकाप्रमाणेच इतरही अशा अनेक अॅक्ट्रेस आहेत, ज्यांनी सलमानबरोबर डेब्यू केला, पण नंतर त्या पडद्यावरून अचानक गायब झाल्या.
भूमिका चावलाव्यतिरिक्त सलमान खानसोबत इंडस्ट्रीत डेब्यू करणा-या इतर अभिनेत्री आता कुठे आहेत, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...