आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहाटे 4 वाजता बायकोला मिठी मारताना दिसला मुन्नाभाई, मान्यताने शेअर केला Photo

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूड सेलेब्रिटी सध्या सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टीव्ह राहू लागलेत. पण ते सोशल मीडियावर कधी काय शेअर करतील याचा नेम नसतो. नुकतीच संजूबाबाने मान्यताला बोल्ड फोटो शेअर करण्याबाबत सुनावले असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण त्यातून मान्यताने धडा घेतलेला दिसत नाही. कारण नुकताच मान्यताने दोघांचा एक रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे हा फोटो पहाटे चार वाजता क्लिक केलेला असल्याचे मान्यताने किवर्डमध्ये म्हटले आहे. 

मान्यता तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे फोटो न चुकता शेअर करत असते. नवऱ्याबरोबरचे आणि मुलांबरोबरचे खास फोटोही मान्यता नेहमी शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच ती मुलांबरोबर युरोप टूरला गेली होती. त्यावेळीही मान्यताने तिचे अनेक ग्लॅमरस फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. मान्यताने आज शेअर केलेल्या तिच्या आणि संजय दत्तच्या फोटोत दोघांचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. या फोटोबरोबर तिने कॅप्शन लिहिले, maanayataHome is where you put your arms around me❤️❤️.. मान्यताने यापू्र्वीही असे अनेक फोटो शेअर केले आहेत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, मान्यताने शेअर केलेले इतर काही PHOTOS
बातम्या आणखी आहेत...