आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Actress Radhika Apte's Hot Photoshoot For GQ Magazine

मराठमोळ्या राधिकाचे आजवरचे सर्वात HOT फोटोशूट, पाहा घायाळ करणारा अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः
युनिक अॅक्टिंग स्टाइल आणि डस्की लूकने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या अभिनेत्री राधिका आपटने अलीकडेच एका मॅगझिनसाठी एक हॉट फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट तिने 'जीक्यू' या प्रसिद्ध फॅशन मॅगझिनसाठी केले आहे. या फोटोशूटमध्ये 'डस्की' राधिका अतिशय हॉट दिसतेय. तिच्यावर हा फॉर्मल लूक अतिशय शोभून दिसतोय. रिव्हिलिंग टॉपमुळे तिचा हा लूक बराच हॉट झालाय. खरं तर राधिका अशाप्रकारचे फोटोशूट फार कमी करते. मात्र जेव्हाही ती अशा फोटोशूटमध्ये दिसते तेव्हा चांगल्या चांगल्यांची बोलती बंद होते.
अभिनयाविषयी बोलायचे झाल्यास, राधिकासाठी मागील वर्ष छान गेले. 'हंटर' आणि 'बदलापूर' हे दोन सिनेमे गेल्यावर्षी रिलीज झाले होते. या सिनेमांतील राधिकाच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते. आता लवकरच ती सुपरस्टार रजनीकांतसोबत 'कबाली' या सिनेामत झळकणारेय. शिवाय 'फोबिया' नावाच्या एका सुपरनॅचरल सिनेमांतही ती काम करत आहे. या सिनेमासाठी तिने बराच रिसर्च केला आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन तुम्हीही बघा राधिकाचा घायाळ करणारा अंदाज...