आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील बंगाली, आई मुस्लिम, आजी ब्रिटिश, अशी आहे इमरानची फॅमिली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'जाने तू या जाने ना', 'आय हेट लव्ह स्टोरी', 'देल्ली बेल्ली', 'मेरे ब्रदर की दुल्हन'सारख्या सिनेमांमध्ये अभियन करणारा अभिनेता इमरान खान जन्म 13 जानेवारी 1983 रोजी यूएसच्या मॅडिसन, विस्कॉन्सिसमध्ये झाला. त्‍याच्‍या विषयी ही खास माहिती...
सुरुवातीला चॉकलेट बॉयची प्रतिमा निर्माण केलेल्या इमरान खानने विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. रोमँटिक हीरोच्या प्रतिमेमधून बाहेर पडून त्याने 'देल्ली बेल्ली', 'मटरू की बिजली का मंडोला' आणि 'वन्स अपॉन टाइम ए मुंबई दोबारा'मध्ये त्याने बिनधास्त भूमिका साकारल्या. मात्र, इमरानचा एक सिनेमा यशस्वी झाला तर त्यानंतर रिलीज झालेले तीन-चार सिनेमे फ्लॉप होतात. इमरान अद्याप स्वत:ला इंडस्ट्रीमध्ये स्थापित करू शकलेला नाही.
2008मध्ये त्याने 'जाने तू या जाने ना'मधून पदार्पण केल्यानंतर मामा आमिर खानने त्याच्यावर विश्वास दाखवून काहीही चुकीचे केलेले नाहीये, असे सांगितले होते. आमिरने इमरानला अभिनेत्री जेनेलिया डिसूजासोबत लाँच केले. या जोडीला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिली.
इमरानच्या कुटुंबीयांविषयी सांगायचे झाले तर, त्याचे आजोबा बंगाली आणि आजी ब्रिटीश महिला आहे. त्याच्या आईचे वडील नासिर हुसैनसुध्दा निर्माता-दिग्दर्शक होते. त्यामुळे इमरानचा नेहमीच सिनेमाकडे कल राहिला. मात्र, त्याला दिग्दर्शक व्हायचे होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इमरान खानच्या खासगी आयुष्यासंबंधित काही FACTS...
बातम्या आणखी आहेत...