आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How Swara Bhaskar’s Dad Taught Her That Menstruation Is Not A Taboo

वादग्रस्‍त वक्‍तव्‍यामुळे चर्चेत असते ही नटी, सांगितल्‍या वैयक्तिक गोष्‍टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड - अभिनेत्री स्‍वरा भास्‍कर ही या ना त्‍या कारणाने कायम चर्चेत असते.काही दिवसांपूर्वी तिने गुजरात दंगल, जेएनयूतील नारेबाजी या संदर्भात मत व्‍यक्‍त करून वाद ओढून घेतला होता. ती चंदीगडला आली असता 'दैनिक भास्‍कर'ने विविध विषयांवर तिच्‍यासोबत चर्चा केली. यात तिने नवीनच खुलासा केला असून, 'पीरियड्स' बाबत आपण आपल्‍या वडिलांसोबत चर्चा केल्‍याचे तिने सांगितले. शिवाय वैयक्तिक आयुष्‍याबद्दल तिने अनेक खुलासे केले.
स्वराला नेमके काय आवडते...
> स्वरा भास्करला मांजरांसोबत राहणे खूप आवडते. लहानपणापासून तिने आतापर्यंत 10 मांजरी पाळल्‍या आहेत.
> सध्‍या तिच्‍याकडे तीन मांजरी असून, अॅटम, उत्पत्‍ती आणि कुल्फी अशी त्‍यांची नावे आहेत.
> या मांजरांचे नावं जितकी वेगळे आहेत तितकेच त्‍यांच्‍यात गुणही असल्‍याचे स्‍वरा सांगते.
> आपला स्‍वभाव हा मांजरी सारखाच असल्‍याचे ती सांगते.
> स्वरा सांगते, ''मांजरांचे वागणे, खाणे- पिणे नवाबांसारखेच आहे. तिला जे हवे ते ती करून घेते.''
कुणासारखी आहे स्वरा
> स्वरा सांगते मांजरामध्‍ये एटीट्यूड भरपूर असतो. मीसुद्धा अशीच आहे. माझी एक मांजर खूप एटीट्यूड असलेली आहे.
> जेव्‍हा तिला तहान लागते तेव्‍हा तिला फ्रेश पाणीच द्यावे लागते. समोर असलेले शिळे पाणीसुद्धा ती पीत नाही.
> माझ्या मित्रांप्रमाणेच माझ्या मांजरीसुद्धा माझ्यावर प्रेम करतात.
> त्‍या रागावल्‍या की माझ्या पर्समध्‍ये घुसून घाण करतात.
> घरात कुणी माझे मित्र आले तर गोंधळ घालून त्‍यांना बाहेर जाण्‍यास भाग पाडतात.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा , कसे गेले स्वराचे लहानपण, वडिलांनी रस्‍त्‍यावर का केले कोंबडा... कवी पाश यांच्‍या कविता खूप आवडतात... सोनम आहे डाउन-टू-अर्थ...पीरियड्स बाबत पप्‍पांनी काय सांगितले...