आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ राधिका, माधुरीच नव्हे या मराठमोळ्या अभिनेत्रींनी गाजवली आहे हिंदी चित्रपटसृष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज राधिका आपटेचा वाढदिवस. 7 सप्टेंबर 1985 रोजी जन्मलेलील राधिका मुळची पुण्याची आहे. आज राधिका हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सर्वगुणसंपन्न अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 'वाह लाईफ हो तो ऐसी' या चित्रपटात एक लहानशी भूमिका करुन पदार्पण करणारी राधिकाच्या नावे आज अनेक पुरस्कार आहेत. बॉलिवूडमध्ये नाव कमावणाऱ्या मराठी अभिनेत्रींमध्ये राधिकाचे नाव आहे. पण केवळ राधिकाच नाही तर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या मुळच्या मराठी कुटुंबात जन्मलेल्या आहेत. आज राधिकाच्या वाढदिवसानिमित्त अशाच काही अभिनेत्रींची माहिती घेऊन आलो आहोत. माधुरी आहे अग्रणीची अभिनेत्री..
 
माधुरी दीक्षित - केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात माधुरी दिक्षीतचे चाहते आहेत हे वेगळे सांगायला नको. लहानपणी मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या माधुरीला लहानपणापासूनच चित्रपटांची आवड होती. त्यामुळे वयाच्या 16 व्या वर्षीच माधुरीने पहिला चित्रपट अबोध केला. आज हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून माधुरी दिक्षितचे नाव घेतले जाते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, इतर काही मराठमोळ्या अभिनेत्री ज्यांनी बॉलिवूडमध्ये कमावले नाव...
बातम्या आणखी आहेत...