आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींपासून SRK-आमिरपर्यंत, सलमान खानच्या बहिणीच्या लग्नात पोहोचले होते हे दिग्गज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खान हिच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. 18 नोव्हेंबर रोजी अर्पिताने पती आयुष शर्मा आणि फॅमिली मेंबर्ससोबत लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. अर्पिता आणि आयुषचे लग्न हैदराबादच्या ताज फलकनुमा पॅलैसमध्ये झाले होते. त्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी मुबंईतील हॉटेल ताज लँड्समध्ये खान कुटुंबीयांच्या वतीने एका जंगी रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, शाहरुख खान, आमिर खान, प्रियांका चोप्रा, करण जोहर, सानिया मिर्झा, कतरिना कैफसह बॉलिवूड, राजकारण आणि उद्योग जगतातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावून वर-वधूला शुभाशिर्वाद दिले होते. 


पार्टीत झाली होती अर्पिता-आयुषची पहिली भेट...
- अर्पिता आणि आयुषची पहिली भेट 2013 साली एका पार्टीत झाली होती.
- एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून दोघांची भेट झाली होती. आयुष पहिल्याच भेटीत अर्पिताच्या प्रेमात पडला होता.
- काही भेटीनंतर एका पार्टीत आयुषने सर्वांसमोर अर्पिताला लग्नाची मागणी घातली होती.
- त्यानंतर दोघांचे लग्न निश्चित झाले होते. 


राजकीय कुटुंबातून आहे आयुष...
- आयुष शर्मा एक बिझनेसमन असून राजकीय कुटु्ंबातून आहे. त्याचे वडील अनिल शर्मा हिमाचल प्रदेश सरकारमध्ये मंत्री आहेत.
- याशिवाय त्याचे आजोबा सुखराम शर्मा राजकारणातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहेत. ते पाच वेळा विधानसभा आणि तीन वेळा लोकसभा निवडणूकीत विजयी ठरले. ते  यूपीए सरकारमध्ये केंद्रीय संचार मंत्री(1996 मध्ये) होते.


पुढील स्लाईड्सवर बघा, अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांच्या लग्नाचे निवडक PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...