आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये साकारली बिग बींच्या बालपणीची भूमिका, आता दिसतात असे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अमिताभ बच्चन यांच्या 1983 साली रिलीज झालेल्या 'कुली' या सिनेमात त्यांच्या बालपणीची भूमिका साकारणारा बालकलाकार तुम्हाला आठवतोय का... मास्टर रवी या नावाने प्रसिद्ध असलेला हा बालकलाकार आता 46 वर्षांचा झाला आहे. मास्टर रवी या नावानेच हा कलाकार 1977 साली रिलीज झालेल्या 'अमर अकबर अँथोनी' या सिनेमातसुद्धा अमिताभ बच्चन यांच्या बालपणीच्या भूमिकेत झळकला होता. 6 जून 1971 रोजी जन्मलेल्या मास्टर रवीने 1976 साली आलेल्या 'फकीरा' या सिनेमाद्वारे बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. रवी यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या भाषांमधील सुमारे 300 हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. मास्टर रवीचे पूर्ण नाव रवी वलेचा असे आहे.

आता हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत काम करतात रवी वलेचा...
- तारुण्यात पदार्पण केल्यानंतर मास्टर रवी, रवी वलेचा या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून मास्टर इन हॉस्पिटॅलिटी अँड इंटरनॅशनल बिजनेस या विषयात एमबीए केले आहे. 
- रवी वलेचा आज हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे. ते आता भारतातील प्रायव्हेट सेक्टरमधील टॉप बँकमध्ये हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचे काम सांभाळत आहेत. 
- इतकेच नाही तर ज्यांना हॉस्पिटॅलिटी फिल्डमध्ये करिअर करायचे आहे, त्यांना रवी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि इतर स्किल्सचे ट्रेनिंगसुद्धा देतात.  

पुढील स्लाईड्समध्ये बघा, अमिताभ यांच्या बालपणीची भूमिका वठवणा-या रवी वलेचा यांचे PHOTOS आणि वाचा त्यांच्याविषयीची आणखी माहिती...
 
बातम्या आणखी आहेत...