आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्याच्या झोपडपट्टीत राहणारा हा चिमुकला बनला बॉलिवूड फिल्मचा लीड अॅक्टर, असा मिळाला रोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी 50 डिग्री तापमानात धावत पुरी ते भुवनेश्वर हा 65 किलोमिटरचा प्रवास केवळ 7 तास 2 मिनिटांत पूर्ण करणा-या बुधिया सिंहने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. तो लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही आपले स्थान मिळवणारा पहिला बालक असून 48 मॅरेथॉन धावणा-या बुधियाचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. येत्या 5 ऑगस्टला अशा या बुधिया सिंहच्या जीवनावर आधारीत ‘बुधिया सिंह – बॉर्न टू रन’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमात बुधियाची भूमिका साकारली आहे बालकलाकार मयुर पाटोळे या मराठमोळ्या चिमुकल्याने. मयुरचे खासगी आयुष्य बुधियाच्या आयुष्याशी मिळतेजुळते असल्याचे सांगितले जाते. सिनेमात बुधियाच्या कोचची भूमिका मनोज वाजपेयीने साकारली आहे.

जाणून घेऊयात मयुरविषयी...
- या सिनेमातील बुधियाच्या भूमिकेसाठी दिग्दर्शक सोमेंद्र पाधी यांनी ओडीसा, छत्तीसगड, पुणे आणि मुंबईतील धारावी येथील सुमारे 1200 मुलांच्या ऑडीशन्स घेतल्या.
- यामध्ये बुधियाच्या भूमिकेसाठी पुण्याच्या मयुरची निवड झाली. मयूरचे खासगी आयुष्य बुधियाच्या आयुष्याशी साधर्म्य साधणारे आहे.
- बुधियाप्रमाणेच मयुरसुद्धा पुण्यातील एका झोपडपट्टीत वास्तव्याला आहे. त्याचे कुटुंब अतिशय गरीब असून हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतित करत आहे.
- शूटिंगच्या वर्षभरापूर्वीच मयुरच्या वडिलांचे निधन झाले होते. मयुर बुधियाप्रमाणेच कमी बोलणारा असून आईसोबत राहतो.

भूमिकेसाठी कशी केली तयारी...
- दिग्दर्शक सोमेंद्र पाधी यांनी मयुरला बुधियाच्या भूमिकेत शिरण्यासाठी ओडीसाच्या झोपडपट्टीत आणि चाळीत अनेक दिवस ठेवले.
- शूटिंगच्या काळात त्याला चॉकलेट खायला मनाई करण्यात आली होती.

7 तास 2 मिनिटांत पूर्ण केला होता 65 किलो मीटरचा प्रवास..
- वंडर किड म्हणून प्रसिद्ध असलेल्या बुधियावर आधारित या सिनेमाचे शीर्षक आधी 'दुरंतो' असे ठेवण्यात आले होते. नंतर ते बदलून 'बुधिया सिंह बॉर्न टू रन' असे करण्यात आले. या सिनेमाला 63 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट बालसिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
- पुरी ते भुवनेश्वर हा 65 किलोमीटरचा प्रवास त्याने 2006 मध्ये सात तास दोन मिनिटांत पूर्ण केला होता. त्याच्या नावाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे.

800 रुपयांत विकले होते बुधियाला...
- ओडिसाच्या एका गरीब कुटुंबात 2002 मध्ये जन्मलेल्या बुधियाला त्याच्या आईने एका व्यक्तिला केवळ आठशे रुपयांत विकले होते.
- त्यानंतर ज्युडो-कराटेचे कोच असलेल्या बिरांची दास यांनी त्याला दत्तक घेतले.
- बिरांची यांनी बुधियाला मॅरेथॉनसाठी प्रशिक्षण देऊन तयार केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी बुधियाने इतिहास रचला.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, मयुरचे निवडक PHOTOS... सहाव्या स्लाईडमध्ये बघा, सिनेमाचा ट्रेलर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...