आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

52 वर्षांची झाली मिनाक्षी शेषाद्री, राजकुमार संतोषीसोबत जुळले होते नाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे वरती पती हरीश मैसूर, मुलगी केंद्र, मुलगा जोश आणि अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री)
 
मुंबई : ‘दामिनी’, ‘हीरो’ आणि ‘घातक’सारखे सुपरहिट सिनेमे देऊन बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मीनाक्षई शेषाद्री 52 वर्षांची झाली आहे. बॉलिवूडमधील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री आता सिनेमाच्या या ग्लॅमर दुनियेपासून खूप दूर झाली आहे. सिनेमे करण्यामध्ये आता फरसा रस नसल्याचं तिने स्वत: स्पष्ट केले आहे.  
 
मिनाक्षीमध्ये सौंदर्य आणि अभिनयाचा मिलाफ होता. भरतनाट्यम्, कुचिपुडी, कत्थक, ओडिसी यासारख्या शास्त्रीय नृत्यांत पारंगत असलेल्या मीनाक्षीने वयाची 52 वर्षे पूर्ण केली आहेत. राजकुमार संतोषी यांच्या \'घायल\' या सिनेमातून तिने उत्कृष्ट अभिनयाचा नमुना सादर केला. 80-90 च्या दशकात मिनाक्षी बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री होती. मात्र लग्नानंतर अचानक ती बॉलिवूडमधून अज्ञातवासात निघून गेली. मिनाक्षी सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे. 
 
वयाच्या 17 व्या वर्षी बनली होती मिस इंडिया 
16 नोव्हेंबर 1963 रोजी धनबाद येथे जन्मलेल्या मिनाक्षीने वयाच्या 17 व्या वर्षी मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केला होता. मिनाक्षीने 1982 साली ‘पेंटर बाबू’तून रुपेरी पडद्यावर आगमन केले होते. या सिनेमात तिचा नायक मनोजकुमार यांचा भाऊ राजीव गोस्वामी हा होता. मात्र तिला खरी ओळख मिळवून दिली ती \'हीरो\' या सिनेमाने. यामध्ये जॅकी श्रॉफ तिचा हीरो होता. आपल्या फिल्मी करिअरमध्ये मिनाक्षीने \'मेरी जंग\', \'घर हो तो ऐसा\', \'घायल\', \'दामिनी\', \'घातक\' यांसारख्या अविस्मरणीय सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.
 
राजकुमार संतोषी यांच्यासोबत जुळले होते मिनाक्षीचे नाव
एकेकाळी मिनाक्षीचे नाव दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्यासोबत जुळले होते. राजकुमार संतोषी यांच्या अधिकाधिक सिनेमांमध्ये मिनाक्षीने काम केले आहे. संतोषी यांनी तिच्याकडे आपल्या प्रेमाची कबुलीसुद्धा दिली होती. मात्र तिने त्यांचा प्रस्ताव स्वीकारला नव्हता.
 
आता अमेरिकेत वास्तव्याला आहे मिनाक्षी 
इन्व्हेस्टमेंट बँकर हरीश मैसूर याच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर मिनाक्षीने सिनेसृष्टीला रामराम ठोकला. मुलगी केंद्रा आणि मुलगा जोश, या दोन मुलांची आई असलेली मिनाक्षी अमेरिकेतील टेक्सासमधील प्लॅनो येथे राहते. हरीशसोबत मिनाक्षीने न्यूयॉर्क येथे रजिस्टर्ड मॅरेज केले होते. आता ती येथे डान्स अकॅडमी चालवते.
 
डान्स अॅकॅडमी चालवते मिनाक्षी 
फिल्म इंडस्ट्री सोडल्यानंतर मिनाक्षीने डान्सकडे कल दाखवला. ती टेक्सासमध्ये राहून कत्थक आणि क्लासिकल डान्स शिकवते. टेक्सासमध्ये राहणा-या भारतीयांमध्ये ती प्रसिध्द आहे. 
 
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मिनाक्षी शेषाद्रीची तिच्या कुटुंबीयांसोबतची खास छायाचित्रे...