आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Meenakshi Seshadri Decline The News Of Comeback With Its Sequel Ghayal Once Again

Remember Her : सिनेसृष्टीत कमबॅक करण्यास या अॅक्ट्रेसचा नकार, आता USA मध्ये राहते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे - अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री, उजवीकडे - पती आणि दोन मुलांसोबत मिनाक्षी)
मुंबई : बॉलिवूडमधील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री आता सिनेमाच्या या ग्लॅमर दुनियेपासून खूप दूर झाली आहे. सिनेमे करण्यामध्ये आता फरसा रस नसल्याचं तिने स्वत: स्पष्ट केले आहे. 1990 साली प्रदर्शित झालेल्या ‘घायल’मध्ये मिनाक्षी होती.
मिनाक्षी सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे. अलीकडेच एका कार्यक्रमात मिनाक्षीने उपस्थिती लावली होती, त्यावेळी तिने आगामी 'घायल'च्या सिक्वेलमध्ये भूमिका करत नसल्याचे स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून चर्चांना उधाण आले होते की, 'घायल'च्या सिक्वेलधून मिनाक्षी शेषाद्री बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. मात्र, आता दस्तुरखुद्द मिनाक्षीनेच स्पष्ट केले आहे, की आता मला सिनेमे करण्यात रस नाही. मात्र, नाटक किंवा संगीत नाटकांमध्ये काम करण्याची तयारी आहे.
वयाची 51 वर्षे केली पूर्ण
मिनाक्षीमध्ये सौंदर्य आणि अभिनयाचा मिलाफ होता. भरतनाट्यम्, कुचिपुडी, कत्थक, ओडिसी यासारख्या शास्त्रीय नृत्यांत पारंगत असलेल्या मीनाक्षीने वयाची 51 वर्षे पूर्ण केली आहेत. राजकुमार संतोषी यांच्या 'घायल' या सिनेमातून तिने उत्कृष्ट अभिनयाचा नमुना सादर केला. 80-90 च्या दशकात मिनाक्षी बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री होती. मात्र लग्नानंतर अचानक ती बॉलिवूडमधून अज्ञातवासात निघून गेली.
आता अमेरिकेत वास्तव्याला आहे मिनाक्षी
इन्व्हेस्टमेंट बँकर हरीश मैसूर याच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर मिनाक्षीने सिनेसृष्टीला रामराम ठोकला. मुलगी केंद्रा आणि मुलगा जोश, या दोन मुलांची आई असलेली मिनाक्षी अमेरिकेतील टेक्सासमधील प्लॅनो येथे राहते. हरीशसोबत मिनाक्षीने न्यूयॉर्क येथे रजिस्टर्ड मॅरेज केले होते. आता ती येथे डान्स अकॅडमी चालवते.
वयाच्या 17 व्या वर्षी बनली होती मिस इंडिया
16 नोव्हेंबर 1963 रोजी धनबाद येथे जन्मलेल्या मिनाक्षीने वयाच्या 17 व्या वर्षी मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केला होता. मिनाक्षीने 1982 साली ‘पेंटर बाबू’तून रुपेरी पडद्यावर आगमन केले होते. या सिनेमात तिचा नायक मनोजकुमार यांचा भाऊ राजीव गोस्वामी हा होता. मात्र तिला खरी ओळख मिळवून दिली ती 'हीरो' या सिनेमाने. यामध्ये जॅकी श्रॉफ तिचा हीरो होता. आपल्या फिल्मी करिअरमध्ये मिनाक्षीने 'मेरी जंग', 'घर हो तो ऐसा', 'घायल', 'दामिनी', 'घातक' यांसारख्या अविस्मरणीय सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.
राजकुमार संतोषी यांच्यासोबत जुळले होते मिनाक्षीचे नाव
एकेकाळी मिनाक्षीचे नाव दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्यासोबत जुळले होते. राजकुमार संतोषी यांच्या अधिकाधिक सिनेमांमध्ये मिनाक्षीने काम केले आहे. संतोषी यांनी तिच्याकडे आपल्या प्रेमाची कबुलीसुद्धा दिली होती. मात्र तिने त्यांचा प्रस्ताव स्वीकारला नव्हता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मिनाक्षी शेषाद्रीची तिच्या कुटुंबीयांसोबतची खास छायाचित्रे...