आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे मिथून चक्रवर्तींची स्टायलिश मुलगी, तान्ही असताना सापडली होती कचराकुंडीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचे 'डिस्को डान्सर' अर्थातच मिथुन चक्रवर्ती लवकरच बांग्लादेशी सिनेमा 'हसन राजा'मध्ये झळकणारेय. या सिनेमाचे दिग्दर्शक ब्रिटिश-बंगाली फिल्ममेकर राहुल अमीन हे आहेत. मिथून यांच्यासह रायमा सेन या सिनेमात झळकणारेय. मिथून यांच्याप्रमाणेच आता त्यांची लाडकी लेक दिशानीसुद्धा लवकरच बॉलिवूडमध्ये दिसू शकते. सध्या दिशानी न्यूयॉर्कच्या फिल्म अकॅडमीत शिक्षण घेत आहे.  

सोशल मीडियावर अॅक्टिव असते दिशानी...
शाहरुख खानची मुलगी सुहाना, श्वेता बच्चनची मुलगी नव्या नवेली नंदा, श्रीदेवीच्या जान्हवी आणि खुशीप्रमाणेच दिशानीसुद्धा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. दिशानीचे इंस्टाग्राम अकाउंट बघितले असता, ती बी टाऊनच्या मोस्ट स्टायलिश स्टार डॉटर्सपैकी एक आहे.
 
चार मुलांचे वडील आहेत मिथून दा...
मिथून दांना अभिनेत्यासोबतच समाजसेवक, बिझनेसमन आणि राज्यसभा सदस्याच्या रुपात ओळखले जाते. दोनदा फिल्मफेअर आणि तीनदा नॅशनल अवॉर्डचे मानकरी ठरलेले मिथून चक्रवर्ती यांनी 1982 साली अभिनेत्री योगिता बालीसोबत लग्न केले होते. त्यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे. महाक्षय, रिमोह आणि नमाशी चक्रवर्ती ही त्यांच्या मुलांची तर दिशानी चक्रवर्ती हे त्यांच्या मुलीचे नाव आहे.
 
मुलीला घेतलंय दत्तक...
मिथून दांची ही लाडकी लेक आता मोठी झाली असून सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव असते. मात्र दिशानी ही मिथून दांची दत्तक मुलगी असल्याचे तुम्हाला माहित आहे का... दिशानी अगदी तान्ही असताना कोलकाता शहराबाहेरील एका कचराकुंडीत सापडल्याचे म्हटले जाते. तिलाच मिथून दांनी दत्तक घेऊन आपले नाव दिले. इतकेच नाही तर तीन मुलांइतकाच संपत्तीत वाटा दिल्याचेही म्हटले जाते.
 
न्यूयॉर्कमध्ये शिकतेय दिशानी...
मिथून दांची लाडकी लेक दिशानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. कारण ती सध्या न्यूयॉर्कच्या फिल्म अॅकेडमीत अभिनयाचे धडे गिरवत आहे. दिशानी नेहमीच आपल्या वडील आणि थोरल्या भावांसोबत पेज थ्री पार्टीजमध्ये दिसत असते. सेलिब्रिटी डॉटर असल्याने दिशानी इतर स्टार किड्सप्रमाणेच स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. ती लेटेस्ट फॅशन फॉलो करताना दिसते. भविष्यात आपल्या आईवडील आणि भावाच्या पावलावर पाऊल ठेवत दिशानीसुद्धा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करेल, असे म्हणता येईल.
 
या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाल दिशानीने इंस्टाग्राम शेअर केलेले तिचे खास फोटोज दाखवत आहोत. पुढे क्लिक करुन पाहा, किती स्टायलिश आहे मिथून दांची ही लाडकी लेक...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...