आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत आहेत बिग बींचे हे नातेवाईक, कुणीच दिला नाही मदतीचा हात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाची गणना केवळ बॉलिवूडच नव्हे तर भारतातील श्रीमंत लोकांमध्ये होते. एका लीडिंग वेबसाइटने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन यांच्या कुटु्ंबातील एक नातेवाईक मात्र अत्यंत हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत आहे. या नातेवाईकाचे नाव अनुप रामचंदर आहे. पत्नी मृदुला आणि मुलांसोबत ते गरिबीत जीवन व्यतित करत आहेत. 

नात्याने अमिताभ यांचा पुतण्या आहे अनुप...  
- अमिताभ बच्चन यांचे वडील डॉ. हरिवंशराय बच्चन यांना एक थोरली बहीण होती. त्यांचे नाव भगवानदेई असे होते. 
- भगवानदेई यांचा मुलगा रामचंदर यांना चार मुले होते. अनुप हा त्यांचा तिसरा मुलगा आहे. या नात्याने अनुप बिग बींचा पुतण्या होतो. 
- अनुप अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे. दोन वेळेचे जेवण मिळवणेसुद्धा त्यांना कठीण झाले आहे.
- अनुप इलेक्ट्रिकचे काम करतात. हे त्यांचे उदरनिर्वाह एकमेव माध्यम आहे.  
 
हलाखीच्या परिस्थितीमुळे अभिषेक बच्चनच्या लग्नात सहभागी झाले नव्हते... 
- अनुप यांची पत्नी मृदुला यांनी एका मुलाखतीत सांगितले, की पैशांच्या तंगीमुळे ते अभिषेक बच्चनच्या लग्नात सहभागी होऊ शकले नव्हते.  
- बच्चन कुटुंबीय ओळख दाखवणार नाहीत, अशी भीती त्यांना सतावत होती.
- याच कारणामुळे ते अमिताभ यांच्या एकुलत्या एका मुलाच्या लग्नात सहभागी झाले नाहीत.
 
वडिलोपार्जित घर ठरले वादाचे कारण
- अनुप आणि मृदुला त्यांच्या मुलीसोबत डॉ. हरिवंशराय बच्चन यांच्या  कटघर स्थित घराच्या एका भागात वास्तव्याला आहेत.
- हे वडिलोपार्जित घर असून याच घरामुळे त्यांच्या नातेवाईकांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.
- अनुप यांची इच्छा होती, की अमिताभ बच्चन यांनी या घराचे संग्रहालयात रुपांतर करुन येथे हरिवंशराय बच्चन यांच्या आठवणी जतन कराव्यात
- पण अनुप यांच्या या मागणीकडे अमिताभ बच्चन यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे या दोघांत वाद झाला होता. 

पुढील स्लाईड्सवर बघा, अमिताभ बच्चन यांचे फॅमिली PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...