आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोण-कोण आहेत अनिल कपूर यांच्या कुटुंबात, जाणून घ्या फॅमिलीतील प्रत्येक सदस्याविषयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनिल कपूर आपल्या कुटुंबियांसोबत - Divya Marathi
अनिल कपूर आपल्या कुटुंबियांसोबत
मुंबई- फिल्म इंडस्ट्रीत अभिनय, डायलॉग आणि डान्सने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. हर्षवर्धनची प्रमुख भूमिका असलेला मिर्झिया हा सिनेमा 7 ऑक्टोबर रोजी रिलीज होतोय. या सिनेमाचे अलीकडेच मुंबईतील लाइट बॉक्स थिएटरमध्ये स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. सलमान खानचे वडील सलीम खान आणि आई हेलन यांच्यासह अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला पोहोचले होते. अनिल कपूर यांच्या मुलाचा हा पहिला सिनेमा असला तरी त्यांच्या फॅमिलीतील अनेक सदस्य फिल्म इंडस्ट्रीत अॅक्टिव आहेत. अनिल कपूर यांना जान्हवी, खुशी, अंशुला आणि शनाया कपूर या चार पुतण्या आणि अर्जुन-जहान हे दोन पुतणे आहेत.

बॉलिवूडमध्ये अॅक्टिव आहे कपूर फॅमिली
आई-वडील- अनिल कपूर यांचे वडील सुरेंद्र कपूर बॉलिवूडचे यशस्वी निर्मात्यांपैकी एक होते. त्यांनी 'पुकार', 'नो एंट्री', 'जुदाई', 'हम पांच', 'वो सात दिन'सारखे सिनेमे निर्मित केले होते. त्यांच्या आईचे नाव निर्मल कपूर आहे.
अनिल यांची मुले- अनिल कूपूर यांना तीन मुले आहेत. त्यामध्ये दोन मुली सोनम आणि रिया, मुलगा हर्षवर्धन आहे. सोनम बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री आणि रिया निर्माती आहे. तसेच मुलगा बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. हर्षवर्धनने यापूर्वी अनुराग कश्यपसोबत 'बॉम्वे वेल्वेट'मध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे.

थोरले भाऊ- अनिल यांचे थोरला भाऊ बोनी कपूरसध्दा यशस्वी निर्माते आहेत. बोनी यांची पत्नी बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री श्रीदेवी आहे. त्यांच्या दोन मुली जान्हवी आणि खुशी आहेत. बोनी यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मोना होते, त्यांची दोन मुले अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर आहे. अर्जुन बॉलिवूडमधील यशस्वी यंगस्टार्सपैकी एक आहे.
धाकटा भाऊ- अनिल यांचा धाकटा भाऊ संजय कपूर आहे. संजय बॉलिवूडमध्ये अभिनेता होता, मात्र तो सध्या निर्माता म्हणून काम करतोय. संजय कपूरची पत्नी महिप संधू आहे. त्यांना शनाया ही मुलगी आहे.

बहीणः अनिल यांच्या बहिणीचे नाव रीना मारवाह आहे. संदीप मारवाह त्यांचे पती आहेत. रीना सिनेसृष्टीपासून दूर आहेत. तर त्यांचा मुलगा मोहित मारवाहने फग्ली या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अनिल कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांची छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...