आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा बॉलिवूड अभिनेत्यांच्या Star Wives ना, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान)

मुंबईः बॉलिवूड स्टार्स आपल्या बिझी शेड्युल आणि अभिनेत्रींसोबतच्या लिंकअपच्या बातम्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या नव-याच्या लिंकअपच्या बातम्यांमध्ये त्यांच्या स्टार वाईफ आपले खासगी आयुष्य कसे मॅनेज करत असतील, हा प्रश्न निश्चितच सामान्यांच्या मनात येत असावा. आता तर बॉलिवूडमधील या स्टार वाईफ केवळ कॅमे-यासमोरच येत नाहीत, तर पब्लिसिटी कशी मिळवता येते, हे देखील त्यांना चांगलेच ठाऊक आहे.
अनेक अभिनेत्यांच्या पत्नी यशस्वी उद्योजिका आहेत. बॉलिवूडमध्ये त्या केवळ आपल्या नव-याच्या नावानेच नव्हे तर स्वतःच्या कामानेसुद्धा ओळखल्या जातात. उदाहरणार्थ, बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची पत्नी गौरी खान पत्नी आणि आईसोबतच एक यशस्वी बिझनेसवुमन आहे. तिचे स्वतःचे इंटेरियर स्टोअर आहे. गौरीप्रमाणेच बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्सच्या पत्नी कुटुंबासोबतच आपला बिझनेसदेखील यशस्वीरित्या सांभाळत आहेत.
एक नजर टाकुया बॉलिवूडच्या स्टार पत्नींकडे...