आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत शक्ती कपूरपासून ते रंजीतपर्यंत बॉलिवूडच्या प्रसिद्ध Villains च्या मुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडमध्ये क्राइम मास्टर गोगो (अंदाज अपना अपना) या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते शक्ती कपूर यांनी वयाची ५८ वर्षे पूर्ण केली आहेत. ३ सप्टेंबर १९५८ मध्ये नवी दिल्लीत जन्मलेले शक्ती कपूर यांनी आपल्या करिअरमध्ये ७०० हून अधिक फिल्म्समध्ये काम केले असून त्यांनी वठवलेल्या जास्तीत जास्त भूमिका या खलनायकाच्या आहेत. रिअल लाइफमध्ये शक्ती कपूर यांचे लग्न अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेच्या बहिणीसोबत झाले आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सिद्धांत हे मुलाचे तर श्रद्धा कपूर हे त्यांच्या मुलीचे नाव आहे. दोन्ही मुले सिनेसृष्टीतच करिअर बनवत आहेत.

बॉलिवूडच्या A लिस्टर्समध्ये होते श्रद्धा कपूरच्या नावाची गणना...
शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूरची गणना बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होते. २०१० मध्ये 'तीन पत्ती' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली. मात्र लीड रोलमध्ये पहिल्यांदा ती 'लव का दी एंड' या सिनेमात झळकली होती. खरी ओळख तिला तीन वर्षांनंतर मिळाली. श्रद्धाची प्रमुख भूमिका असलेला 'आशिकी २' हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. श्रद्धाने 'हैदर', 'एक व्हिलन', 'एबीसीडी २' आणि 'बागी' या हिट सिनेमांमध्ये काम केले आहे. तर 'रॉक ऑन २', 'ओके जानू' आणि 'हाफ गर्लफ्रेंड' हे तिचे सिनेमे फ्लओरवर आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये भेटा, बॉलिवूडच्या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलींना आणि बघा त्यांचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...