आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत धर्मेंद्र यांच्या मुली अजिता-विजेता, 50 वर्षांपासून लाइमलाइटपासून आहेत दूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे हीमॅन धर्मेंद्र यांचा आज वाढदिवस आहे.  8 डिसेंबर 1935 रोजी लुधियाना येथे जन्मलेले धर्मेंद्र यांनी वयाची 82 वर्षे पूर्ण केली आहेत. धर्मेंद्र गेल्या 57 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहे. त्यांनी 1960 साली त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्यांच्यानंतर त्यांचा थोरला मुलगा सनी देओल याने सिनेसृष्टीवर राज्य केले. सनीनंतर एन्ट्री झाली ती बॉबी देओलची. पण दुर्दैवाने बॉबीचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरले नाही.

 

सनी आणि बॉबी हे धर्मेंद्र आणि त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांची मुले आहेत. त्यांची दुसरी पत्नी आहे हेमामालिनी. धर्मेंद्र आणि हेमा यांची कन्या ईशा देओल हिनेदेखील सिनेसृष्टीत नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला खरा, पण तिलासुद्धा यश मिळू शकले नाही. धर्मेंद्र यांनी तिसरी पिढी बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. सनी देओलचा मुलगा करण देओल बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय.

 

प्रकाश कौर, सनी देओल, बॉबी देओल, करण देओल, हेमा मालिनी, ईशा देओल, अहाना देओल, धर्मेंद्र यांच्या या फॅमिली मेंबर्सविषयी तुम्ही बरेच काही ऐकले असले. पण या कुटुंबातील दोन व्यक्ती अशा आहेत, ज्यांचा एवढ्या वर्षांत कुठेही उल्लेख झाला नाही. या दोन व्यक्ती आहेत, धर्मेंद्र यांच्या मुली आणि सनी-बॉबीच्या बहिणी अजिता आणि विजेता देओल.


कुठे आहेत, अजिता-विजेता देओल, त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

बातम्या आणखी आहेत...