आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे शाहिद कपूरच्या भावी वधूचा एक्स-बॉयफ्रेंड, शालेय जीवनात होते अफेअर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः पुर्वाश्रमीचा प्रियकर आदित्य लालसोबत मीरा राजपूर, उजवीकडे - शाहिद कपूर)
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून दिल्लीची तरुणी मीरा राजपूतच्या नावाची बरीच चर्चा होतेय. या चर्चेचे कारण म्हणजे मीरा लवकरच शाहिद कपूरसोबत विवाहबद्ध होणारेय. या दोघांचा साखरपुडा झाल्याचेही समजते. स्वतः शाहिदने यावर्षी लग्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शाहिदच्या आयुष्यात मीराची एन्ट्री होण्यापूर्वी अनेक अभिनेत्री येऊन गेल्या. करीना कपूर, प्रियांका चोप्रा, विद्या बालनसोबत त्याचे सूत जुळले होते. आता तर मीरा राजपूतच्या भूतकाळातीलसुद्धा एक गोष्ट उघड झाली आहे. एका लीडिंग न्यूज वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, मीरा राजपूतचे आदित्य लाल नावाच्या तरुणासोबत अफेअर होते.
या बातमीवर विश्वास ठेवला असता, शालेय जीवनात मीराचे आदित्यसोबत सूत जुळले होते. दिल्लीच्या वसंत व्हॅली स्कूलमध्ये हे दोघे शिकत होते. दोघेही शाळेजवळीलच एका मॉलमध्ये नेहमी डेटवर जायचे. काही दिवस दोघांमध्ये सर्वकाही सुरळीत सुरु होते, मात्र नंतर दोघांनी सामंजस्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मीरासोबत ब्रेकअप झाल्यानंतर आदित्य उच्चशिक्षणासाठी लंडनला निघून गेला.
वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, आदित्य शिक्षण पूर्ण करुन गेल्याचवर्षी भारतात परतला आहे. शिवाय तो बॉलिवूडमध्ये पदार्पणाची तयारी करतोय. इतकेच नाही तर आदित्यने पुन्हा एकदा मीराच्या आयुष्यात प्रवेश करण्याचाही प्रयत्न केला. मात्र मीराने पुन्हा त्याच्यासोबत संबंध जोडण्यास नकार दिला.
शाहिद आणि मीराच्या लग्नाच्या कहाणीत आणखी एक ट्विस्ट आला आहे. तो म्हणजे मीराच्या एका मैत्रिणीने शाहिद आणि मीराच्या लग्नाची बातमी अफवा असल्याचे म्हटले आहे. आता या किती तथ्य आहे, हे तर मीरा आणि शाहिदच जाणो.
मीराच्या एक्स बॉयफ्रेंडला भेटलीये शाहिदची एक्स गर्लफ्रेंड
शाहिद कपूरची एक्स गर्लफ्रेंड करीना कपूरची भेट मीराच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत झाली आहे. कथितरित्या आदित्या कोकाकोला कंपनीसाठी काम करतो. येथेच दोघांची भेट झाली होती. करीना या ब्रॅण्डच्या लिम्काची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. करीना आणि आदित्यचे एक छायाचित्रसुद्धा मीडियामध्ये व्हायरल झाले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मीरा राजपूतच्या पुर्वाश्रमीच्या प्रियकराची निवडक छायाचित्रे...