आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IN PICS: हे आहे जेनेलियाचे लातूरमधील सासरचे घर, भेटा तिच्या माहेर-सासरच्या मंडळींना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी आणि हिंदीतील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख याची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिने नुकतीच वयाची 29 वर्षे पूर्ण केली आहेत. 5 ऑगस्ट 1987 रोजी एका ख्रिश्चन कुटुंबात तिचा जन्म झाला. कोकणी ही तिची मातृभाषा आहे. जेनेलिया राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. वयाच्या 15 व्या वर्षी जेनेलिया जाहिरातीत झळकली होती. पार्कर पेनच्या जाहिरातीत अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी तिला मिळाली होती. वयाच्या 16 व्या वर्षी तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. तुझे मेरी कसम या सिनेमाद्वारे तिने अभिनयाचा श्रीगणेशा केला. जेनेलियाने हिंदीसोबत दाक्षिणात्य सिनेमांमध्येही भरपूर काम केले आहे.
रितेश देशमुखसोबत लग्न...
जेनेलियाचे लग्न प्रसिद्ध राजकारणी विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुखसोबत झाले आहे. 'तुझे मेरी कसम' या सिनेमाच्या सेटवर दोघांचे सूत जुळले होते. 3 फेब्रुवारी 2012 रोजी रितेश आणि जेनेलियाचे लग्न झाले आणि ही बॉलिवूड अभिनेत्री लातूरची सूनबाई झाली. ख्रिश्चन आणि महाराष्ट्रीय पद्धतीने दोघांचे लग्न झाले होते. हे दाम्पत्य दोन गोंडस मुलांचे आईवडील आहेत. 25 नोव्हेंबर 2014 रोजी मुलगा रियान आणि 1 जून 2016 रोजी राहिलचा जन्म झाला.

लातूर आहे रितेशचे मुळगाव...
लातूर जिल्ह्यातील बाभळगाव हे रितेशचे मुळगाव आहे. येथेच त्याचे बालपण गेले. आता मुंबईत स्थिरावल्यानंतरसुद्धा रितेश नेहमीच आपल्या मुळगावी भेट देत असतो.

जेनेलियाच्या माहेर आणि सासरच्या मंडळींविषयी..
जेनेलियाच्या माहेरी तिचे आईवडील आणि भाऊ-वहिनी आहेत. निल डिसुजा हे तिच्या वडिलांचे तर जेनेट डिसुजा हे आईचे नाव आहे. जेनेलियाला एक धाकटा भाऊसुद्धा आहे. त्याचे नाव निगेल असे आहे. तर निगेलचे लग्न पंजाबी तरुणीसोबत विवाह केला आहे.

जेनेलियाच्या सासरी....
- बाभळगाव (ता. लातूर) हे जेनेलियाचे सासर आहे.
- दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचा रितेश दुस-या क्रमांकाचा मुलगा रितेशची जेनेलिया पत्नी आहे.
- सुशीलादेवी देशमुख आणि दगडोजीराव देशमुख हे रितेशच्या आजीआजोबांचे नाव.
- वैशालीताई देशमुख हे जेनेलियाच्या सासूबाईंचे नाव आहे.
- विलासरावांचे धाकटे बंधू आणि रितेशचे काका आहेत माजी मंत्री, आमदार दिलीपराव देशमुख. अर्थातच दिलीपराव देशमुख जेनेलियाचे चुलत सासरे आहेत.
- रितेशला अमित आणि धीरज हे दोन भाऊ आहेत. अर्थातच जेनेलियाला दोन दीर आहेत.
- तिचे मोठे दीर अमित देशमुख राजकारणात सक्रिय आहेत. विलासरावांच्या थोरल्या सूनबाई आणि रितेशच्या वहिनी अदिती देशमुख गोल्ड क्रिस्ट हायस्कूलच्या प्रमुख आहेत.
- जेनेलियाचा धाकटा दीर धीरज उद्योग क्षेत्रात असून, दीपशिखा (मूळ नाव हनी भगनानी) चित्रपट क्षेत्राशी निगडित आहेत.
- अवीर देशमुख हा अमित देशमुख यांच्या मुलाचे, तर वंश देशमुख हा धीरज देशमुखांचा मुलगा आहे.
- रिआन आणि राहिल ही रितेश-जेनेलियाच्या मुलांची नावे आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये क्लिक करा आणि बघा जेनेलियाच्या माहेर आणि सासरच्या मंडळींची खास छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...