Home »Gossip» Meet Gulshan Kumar Glamorous Daughter In Law Divya Khosla Kumar

ही आहे गुलशन कुमारांची ग्लॅमरस सून, स्वतःच्याच सिनेमात केलाय आयटम डान्स

दिव्य मराठी वेब टीम | Aug 12, 2017, 12:31 PM IST

मुंबईः बॉलिवूडमध्ये कॅसेट किंग या नावाने प्रसिद्ध गुलशन कुमार यांची आज पुण्यतिथी आहे. 12 ऑगस्ट 1997 रोजी मुंबईतील साऊथ अंधेरी परिसरातील जीतेश्वर महादेव मंदिराबाहेर गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. गुलशन कुमार यांच्या कुटुंबात त्यांचा मुलगा भूषण कुमार, दोन मुली तुलसी आणि खुशालीसोबत सून दिव्या खोसला कुमार आणि एक नातू आहे. गुलशन कुमार यांच्या सूनबाई दिव्या अभिनेत्री आहे. शिवाय दिव्या निर्माती आणि दिग्दर्शिकासुद्धा आहे.

स्वतःच्याच सिनेमात दिव्याने केलाय आयटम डान्स...
- दिव्या खोसला कुमार हिने दिग्दर्शित केलेल्या 'सनम रे' या सिनेमात स्वतः एक आयटम डान्ससुद्धा केला आहे. 'हमने पी रक्खी है' या गाण्यात दिव्याचा हॉट आणि ग्लॅमरस अंदाज बघायला मिळाला होता.
- याशिवाय 'अक्कड-बक्कड बम्बे बो' या सिनेमातसुद्धा दिव्या खोसला आयटम डान्स करताना दिसली होती.

पुढील स्लाईडवर वाचा, चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा भेटली होती गुलशन कुमार यांच्या मुलाला...

Next Article

Recommended