आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 18व्या वर्षी हॉलिडेसाठी आली भारतात आणि झाली स्थायिक, आता थाटतेय युवीसोबत लग्न!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटिश वंशाची बॉलिवूड अभिनेत्री हेजल किच लवकरच क्रिकेटपटू युवराज सिंगसोबच लग्नगाठीत अडकणारेय. या महिन्यात त्यांची रोका सेरेमनीदेखील पार पडणार असल्याचे समजते. अद्याप लग्नाची तारीख निश्चित झालेली नाही, मात्र पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात हे लग्न होणार असल्याचे म्हटले जात आहे.
बातम्यांनुसार, यावर्षी 13 डिसेंबरला आपल्या वाढदिवशी युवराजला लग्न करण्याची इच्छा होती. मात्र जवळच्या एका नातेवाईकाच्या निधनामुळे त्याला लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली. अलीकडेच युवराज आणि हेजल यांना लंडन एअरपोर्टवर एकत्र बघितले गेले होते. अद्याप दोघांनीही आपल्या नात्याची सार्वजनिकरित्या कबुली दिलेली नाही.
जाणून घेऊयात युवराजची भावी वधू हेजल हिच्याविषयी...
वयाच्या 18 व्या वर्षी आली होती भारतात
हेजल वयाच्या 18 व्या वर्षी भारतात आली होती. येथे सुटी घालवण्याच्या निमित्ताने ती आली होती. मात्र अतिशय देखण्या हेजलला येथे मॉडेलिंग आणि अॅक्टिंगच्या ऑफर्स मिळाल्या. त्यानतंर तिने भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे हेजलने यापूर्वी 'हॅरी पॉटर' सीरिजच्या सिनेमांमध्ये एक्स्ट्रा अॅक्टर म्हणून काम केले आहे.
'बिग बॉस'मध्येही झळकली
युवराजची ही भावी वधू ब्रिटिश वंशाची बॉलिवूड अभिनेत्री आहे. 'आ आंते अमलापुरम' या गाजलेल्या आयटम नंबरमध्ये तिने आपला डान्स जलवा दाखवला आहे. याशिवाय सलमान खान आणि करीना कपूर स्टारर 'बॉडीगार्ड'मध्येही ती झळकली आहे. याशिवाय 'बिग बॉस'च्या सातव्या पर्वातही ती दिसली होती. मात्र कमी वोट्स मिळाल्याने पहिल्याच आठवड्यात ती शोमधून बाहेर पडली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, हेजल कीचचे निवडक फोटोज...