आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे हृतिक रोशनचा 'डुप्लिकेट', एका शूटसाठी चार्ज करतो 25 हजार रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : अभिनेता हृतिक रोशनने नुकतीच वयाची 43 वर्षे पूर्ण केली आहेत. 10 जानेवारी 1974 रोजी मुंबईत जन्मलेला हृतिक  प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते राकेश रोशन यांचा मुलगा आहे. हृतिकने वडिलांसोबत सहायक दिग्दर्शकाच्या रुपात त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. रंजक बाबा म्हणजे बॉलिवूडमध्ये हृतिकचा एक डुप्लिकेट आहे. तो अगदी हुबेहुब हृतिकसारखा दिसतो. वरील फोटोमध्ये बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन नव्हे हुबेहुब त्याच्यासारखा दिसणारा रुपेश एम. आहे. रुपेशने हृतिकसोबत कामदेखील केले आहे.
 
अनेक जाहिरातींमध्ये हृतिकसोबत झळकला आहे रुपेश... 
रुपेशच्या सांगण्यानुसार, इमामीच्या डियोंड्रेंट जाहिरातीमध्ये जेवढे लाँग शॉट आहेत, ते सर्व त्याच्यावर चित्रीत करण्यात आले आहेत. शिवाय कोल्ड ड्रिंक माऊंटेन ड्यूच्या जाहिरातीतसुध्दा हृतिक केवळ पाच मिनिटांसाठी सेटवर आला होता आणि आपला डायलॉग बोलून निघून गेला. बाकी जाहिरात रुपेशवर चित्रीत करण्यात आली होती. रुपेश अॅक्टर आणि बॉडी डबलसाठी 25 हजार रुपये प्रति शूट चार्ज करतो. 

पुढे वाचा, 'मोहेंजोदडो' सिनेमात हृतिकच्या बॉडी डबलसाठी मिळाली होती ऑफर...